
माझे वय ४७ वर्षे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मला पाळी ८-१० दिवस लवकर येते आणि अंगावरून खूप जाते. १-२ वेळा तर गोळ्या घेऊन पाळी थांबवावी लागली.
प्रश्र्न १ - माझे वय ४७ वर्षे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मला पाळी ८-१० दिवस लवकर येते आणि अंगावरून खूप जाते. १-२ वेळा तर गोळ्या घेऊन पाळी थांबवावी लागली. मला गर्भाशयाची शस्त्रक्रिया करायची नाही. कृपया यावर काही मार्गदर्शन करावे.
- अंजली म्हात्रे (नवी मुंबई)
उत्तर - वयानुसार स्त्री-संतुलनात होणाऱ्या बदलांवर उपाय करणे हाच यावरचा खरा उपचार होय. शस्त्रक्रियेने अंगावरून जाणे थांबले तरी आतील असंतुलनात अजून भरच पडते आणि अनेकविध त्रास होऊ शकतात, असे अनेक केसेसमधील अनुभव सांगतो. अशोक-ॲलो सॅन गोळ्या तसेच अशोकारिष्ट किंवा लोध्रारिष्ट घेण्याचा उपयोग होईल. पुष्यानुग चूर्ण म्हणून चूर्ण मिळते, अर्धा अर्धा चमचा हे चूर्ण मधात मिसळून घेणे व नंतर तांदळाचे धुवण घेणे हे सुद्धा चांगले. २-३ चमचे कच्चे तांदूळ अर्धा कप पाण्यात २-३ तासांसाठी भिजवून, हाताने कुस्करून गाळलेले पाणी म्हणजे तांदळाचे धुवण. रोज रात्री झोपण्यापूर्वी पोटावर संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल लावणे, फेमिसॅन तेलाचा पिचू वापरणे, फेमिफिट सिरप घेणे हे सुद्धा उपयुक्त होय. या उपायांनी बरे वाटलेच तरीही प्रकृतीनुरूप नेमक्या उपचारांसाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे चांगले.
प्रश्र्न २ - माझा मुलगा १५ वर्षांचा आहे. त्याला दर पावसाळ्यात कान फुटण्याचा त्रास होतो. कानाला दडे बसतात आणि कानातून चिकट स्राव येतो. डॉक्टरांनी दिलेल्या ड्रॉप्समुळे तात्पुरते बरे वाटते. वारंवार असा त्रास होऊ नये यासाठी काय करावे?
- प्रशांत दिवेकर (रत्नागिरी)
उत्तर - मुलाला २-३ महिने नियमितपणे अर्धा अर्धा संतुलन सीतोपलादी चूर्ण मधात मिसळून सकाळ-संध्याकाळ देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी चमचाभर च्यवनप्राश घेण्याचाही फायदा होईल. याशिवाय रोज एकदा कानाला धुरी घेण्याचा उपयोग होईल. म्हणजे निखाऱ्यावर वावडिंग, ओवा, कापूर, हळद, धूप यातील मिळतील ती द्रव्ये टाकून येणारा धूप किंवा तयार टेंडरनेस धूप टाकून येणारा धूप कानाला लागेल या पद्धतीने घ्यावा. वर्तमानपत्राला नरसाळ्याचा आकार देऊन त्याच्या साहाय्याने धूप घेणे सोपे जाते. पावसाळ्यामध्ये दररोज, एरवी आठवड्यातून दोन वेळा, याप्रकारे धुरी घेण्याचा उपयोग होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.