
माझे वय ४८ वर्षे आहे. माझ्या आई-वडिलांना तसेच वडिलांच्या बाजूच्या अनेकांना मधुमेहाचा त्रास आहे. मी दर वर्षी एकदा रक्ताची तपासणी करून घेतो.
प्रश्नोत्तरे
माझे वय ४८ वर्षे आहे. माझ्या आई-वडिलांना तसेच वडिलांच्या बाजूच्या अनेकांना मधुमेहाचा त्रास आहे. मी दर वर्षी एकदा रक्ताची तपासणी करून घेतो. अजून तरी माझे सर्व रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत. मधुमेहाची आनुवंशिकता टाळण्यासाठी काही उपाय सुचवाल?
- योगेश महाजन
उत्तर - आयुर्वेदातील मार्गदर्शनानुसार आहार, आचरणात योग्य काळजी घेतली तर आनुवंशिकता असूनही निरोगी राहता येते. यादृष्टीने रोज नियमित व्यायाम, विशेषतः सूर्यनमस्कार, नियमित चालणे आवश्यक. दुपारचे जेवण १२ ते १ च्या दरम्यान, संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर घेणे; आहारात वेलवर्गीय फळभाज्या, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, तूर यांचा समावेश करणे; साध्या साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर करणे; नियमित अभ्यंग करणे; १५ दिवसांतून एकदा एरंडेल तेलाचा जुलाब घेणे हेसुद्धा चांगले. सर्वांत चांगले म्हणजे एकदा शास्त्रोक्त पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे योग्य. मधुमेहाची संप्राप्ती टाळण्यासाठी वैद्यांच्या मार्गदर्शनाने चंद्रप्रभा, पुनर्नवासव, गोक्षुरादी गुग्गुळ यासारखे योग सुरू करण्याचाही उपयोग होईल.
सकाळी जागे होताच माझ्या हातांची बोटे सुजलेली असतात व जखडल्यासारखी वाटतात. जवळजवळ अर्ध्या तासासाठी मी फारसे काम करू शकत नाही. त्यानंतर त्रास कमी होतो. तसेच अधून मधून गुडघा दुखतो. माझे वय ४२ वर्षे असून मी नोकरी करतो. कृपया मार्गदर्शन करावे.
- राज तापकीर
उत्तर - शरीरात वातदोष वाढत असल्याची ही लक्षणे आहेत. यावर लागलीच व योग्य उपचार करणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी हाताच्या बोटांना तसेच गुडघ्यांवर हलक्या हाताने संतुलन शांती तेल जिरवून लावण्याचा उपयोग होईल. संतुलन वातबल गोळ्या, रास्नादी गुग्गुळ, संतुलन संदेश आसव घेण्याचाही उपयोग होईल. दिवसभर प्यायचे पाणी २० मिनिटांसाठी उकळलेले असणे आणि शक्यतो कोमट असताना पिणे; रात्रीचे जेवण आठ वाजेच्या आसपास करणे; रात्री साडेअकराच्या आत आणि साधारण ६-७ तास शांत झोपणे; गवार, वांगे, चवळी, वाल, वाटाणे, राजमा वगैरे गोष्टी न घेणेसुद्धा श्रेयस्कर.
Web Title: Question And Answer 4th March 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..