प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. बाराव्या वर्षी माझी पाळी सुरू झाली. पहिली २-३ वर्षे पाळी व्यवस्थित येत होती. नंतर वजन वाढले व पाळीची अनियमितता सुरू झाली.

प्रश्नोत्तरे

माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. बाराव्या वर्षी माझी पाळी सुरू झाली. पहिली २-३ वर्षे पाळी व्यवस्थित येत होती. नंतर वजन वाढले व पाळीची अनियमितता सुरू झाली. गेली ५-७ वर्षे गोळी घेतल्याशिवाय पाळी येत नाही. आता आम्हाला मूल हवे आहे, त्याकरता काय करावे लागेल?

- भारती जोशी, पुणे

उत्तर - स्त्रीच्या स्वास्थाकरता तसेच गर्भधारणेकरता पाळी नियमित असणे अत्यंत आवश्यक आहे. गोळ्या घेऊन पाळी येत आहे म्हणजे ठीक आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करणे ठीक नाही. असे केल्यास पुढे गर्भधारणा होणे अवघड ठरते तसेच इतरही त्रास होताना दिसतात. पाळी नियमित होण्याकरता आहारात दूध, साजूक तूप, मनुका, खजूर वगैरेंचा समावेश असावा. शरीरातील रक्तधातू संतुलित राहण्याकरता धात्री रसायन वा सॅन रोझसारखे रसायन एखादे रसायन घेणे चांगले. गोळी घेतल्याशिवाय पाळी येत नाही त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे उत्तम. त्यात केली जाणारी शरीरशुद्धी व त्यानंतर केलेल्या उत्तरबस्तीचा अशा प्रकारच्या त्रासांमध्ये उपयोग होताना दिसतो. संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसव, संतुलन फेमिनाइन सिद्ध तेलाचा पिचू नियमित घ्यावा. स्त्रीसंतुलन कल्प घालून दूध घेणे उत्तम. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे स्त्रीसंतुलन नावाचे स्वास्थ्यसंगीत नियमितपणे ऐकणे चांगले. पाळी न येणे हे लक्षण कुठल्या ना कुठल्या योनीदोषाचे द्योतक असते. त्यामुळे वयाच्या ४०-४५ पर्यंत पाळीमध्ये अनियमितता आढळल्यास योग्य ते आयुर्वेदिक उपचार नक्की घ्यावेत.

गेले काही दिवस माझा घसा सतत कोरडा पडतो आहे. कोविडच्या काळापासून ही लक्षणे फार तीव्र झालेली आहेत. घसा खवखवतो, कोरडा पडतो आणि बऱ्याचदा रात्री कोरडा खोकला येतो. सतत घशात काहीतरी टोचत आहे असे वाटत राहते. काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे...

- श्री. रहाणे, डोंबिवली

उत्तर - घसा सतत कोरडा पडणे, खवखवणे, घशात काहीतरी टोचण्याची भावना अनुभूत होणे ही सगळी लक्षणे वातदोष वाढल्याची आहेत. याकरता आहारात स्निग्ध गोष्टींचा समावेश करणे योग्य ठरेल. रोज किमान ३-४ चमचे घरचे साजून तूप तसेच घरी केलेले लोणी-खडीसाखर आहारात ठेवावी. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा संतुलनचे सीतोपलादी चूर्ण मिसळून असे पाणी दिवसभरात थोडे थोडे घ्यावे. रोज सकाळी संतुलन सुमुख तेलाचा ८-१० मिनिटे गंडूष करावा. एकूणच तोंडातील व घशातील कोरडेपणा कमी होण्यासाठी नाकात नस्यसॅन तुपासारखे औषधी तुपाचे २-३ थेंब दिवसातून २-३ वेळा घालण्याचा उपयोग होईल. शक्य असल्यास संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल घशाला बाहेरून हलक्या हाताने लावावे. हे उपाय करून फरक पडला नाही तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कारण घसा कोरडा पडणे हे अन्य आजाराचे लक्षण असू शकते.

टॅग्स :Family Doctorhealth