प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Menstruation
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझे वय २५ वर्षे आहे. माझी मासिक पाळी दीड-दोन महिन्यांनी येते. तपासणी केली असता बीजाशयावर सिस्ट आहे असे समजले. माझे वजनही वाढते आहे. कृपया काही उपाय सुचवावा.

- राधा कुकडे

उत्तर - स्त्रीसंतुलनातील दोषामुळे या प्रकारचे त्रास होतात. मात्र वेळेवर आणि योग्य उपचार केले तर यामध्ये उत्तम सुधारणा होते असा अनुभव आहे. नियमित सूर्यनमस्कार आणि किमान २० मिनिटांसाठी चालायला जाणे हे आवश्यक. रोज सकाळी एक चमचा ताजी कोरफड घेणे, चंद्रप्रभा, ताज्या कोरफडीपासून तयार केलेले फेमिनाईन बॅलन्स आसव घेणे, फेमिसॅन तेलाचा पिचू वापरणे हे उत्तम. प्यायचे पाणी २० मिनिटांसाठी उकळून घेणे आणि तहान लागेल त्या प्रमाणात पिणे हेसुद्धा आवश्यक. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन, बस्तीच्या माध्यमातून शरीरशुद्धी करून घेणे, उत्तरबस्ती हा स्त्रीसंतुलनासाठी उत्तम असणारा उपचार करून घेणे, स्त्रीसंतुलन हे संगीत रोज ऐकणे हेसुद्धा चांगले. या सर्व उपायांनी आतील दोष जसाजसा कमी होईल, तससशी पाळी नियमित येऊ लागेल आणि वजनही कमी होईल.

फॅमिली डॉक्टरमधील मार्गदर्शनाचा आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर उपयोग झालेला आहे. विशेषतः लॉकडाउनच्या काळात एकदाही दवाखान्यात जायची गरज पडली नाही. याबद्दल आम्ही आभारी आहोत. सध्या भाजी बाजारात झुकिनी, ब्रोकोली, बेबी कॉर्न वगैरे भाज्या सर्रास उपलब्ध असतात. आरोग्याच्या दृष्टीने या भाज्या कशा असतात? कृपया मार्गदर्शन करावे.

- मनीषा झिरमे

उत्तर - मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद. ब्रोकोली ही कोबी-फ्लॉवरसारखी उगवणारी भाजी असते, त्यामुळे तिच्यावर जमिनीतील रासायनिक खतांचे शोषण अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. शिवाय ब्रोकोली व बेबी कॉर्न वातदोषवर्धक असल्याने प्रकृतीचा विचार करून कधी तरी सेवन करायला हरकत नाही. झुकिनी ही दुधी, काकडी, घोसाळी यांच्याशी साधर्म्य असणारी असल्याने तिचा समावेश आहारात करायला हरकत नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctor
loading image
go to top