प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

माझे वय २७ वर्षे असून, माझे काम शिफ्टमध्ये असते. एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री काम करावे लागते. यामुळे मला उष्णतेचा खूप त्रास होतो.

प्रश्नोत्तरे

माझे वय २७ वर्षे असून, माझे काम शिफ्टमध्ये असते. एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री काम करावे लागते. यामुळे मला उष्णतेचा खूप त्रास होतो. विशेषतः उन्हाळ्यात तोंड येते, हातापायांची खूप आग होते, थकवा जाणवतो. कृपया काही उपाय सुचवावा.

- परेश देवके, सोलापूर

उत्तर - रात्रपाळी करावी लागणाऱ्यांमध्ये अशा प्रकारे उष्णतेचे तसेच वातदोष वाढल्यामुळे थकवा, अंगदुखीचे त्रास उद्भवताना दिसतात. अशा व्यक्तींमध्ये वात-पित्ताचे संतुलन होण्यासाठी नियमित अभ्यंग करणे, पादाभ्यंग करणे हे उत्तम होय. रात्रीच्या जेवणानंतर किंवा रात्रपाळी असेल तेव्हा कामावरून घरी आल्यावर झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. उन्हाळ्यात सकाळ-संध्याकाळ कामदुधा गोळ्या, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणे, १५ दिवसांतून एकदा सुटीच्या आदल्या दिवशी एरंडेल तेल घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी २-३ वेळा पोट साफ होऊ देणे हे सुद्धा चांगले. थकवा कमी होण्यासाठी प्रसादाची छोटी वाटी भरून नारळाचे दूध व खडीसाखर घेण्याचा, सकाळी चमचाभर धात्री रसायन घेण्याचाही चांगला फायदा होईल.

मी ‘फॅमिली डॉक्टर’ नियमित वाचते. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे सर्व लेख खूप प्रेरणा देणारे असतात. याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद. माझे वय ३५ वर्षे आहे. आमच्या घरात आई, तिची बहीण, माझी ताई या सर्वांचे गर्भाशय काढून टाकलेले आहे. आपल्या मार्गदर्शनानुसार मी गर्भाशय काढणार नाही, असा निश्र्चय केलेला आहे. सध्या तरी माझी पाळी नियमित आहे. पण भविष्यात त्रास होऊ नये यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.

- मानसी, औरंगाबाद

उत्तर - श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे सांगतात त्याप्रमाणे गर्भाशय काढावे लागू नये यासाठी आधीपासूनच स्त्रीसंतुलनाबाबत जागरूक राहण्याचा आपला निर्णय उत्तम आहे. यादृष्टीने शतावरी कल्प घालून दूध घेणे, फेमिसॅन तेलाचा पिचू वापरणे, संतुलन समर्पण, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, चालणे यांचा रोजच्या जीवनक्रमात अंतर्भाव करणे, श्रीगुरुजींचे स्त्रीसंतुलन हे स्वास्थ्यसंगीत ऐकणे उपयोगी पडेल. आधीपासून नीट काळजी घेतली तर रजोनिवृत्तीच्या दरम्यान त्रास होतच नाही, पण आनुवंशितकेमुळे काही त्रास वाटला तर लवकरात लवकर आयुर्वेदाची मदत घेणे श्रेयस्कर होय.

Web Title: Question And Answer 8th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top