प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 1 November 2019

मला आमवात व दम्याचा त्रास आहे. मला जर मूल झाले तर त्याच्यात हे आनुवंशिक दोष येऊ नयेत यासाठी काही उपाय करता येतील का? तसेच, मला शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर चालतील का? 
.... गायत्री 
आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा पथ्यकर, अग्निदीपन करणाऱ्या, आम पचविणाऱ्या, दमा-त्वचाविकार यामध्ये पथ्यकर सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आमवात व दमा या दोन्ही त्रासांवर शेवग्याच्या शेंगा खायला हरकत नाही. उष्ण प्रकृती असणाऱ्या किंवा उष्णतेचे त्रास असणाऱ्या व्यक्‍तीने शेवग्याच्या शेंगा कमी प्रमाणात घेणे श्रेयस्कर असते. 

मला आमवात व दम्याचा त्रास आहे. मला जर मूल झाले तर त्याच्यात हे आनुवंशिक दोष येऊ नयेत यासाठी काही उपाय करता येतील का? तसेच, मला शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर चालतील का? 
.... गायत्री 
आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा पथ्यकर, अग्निदीपन करणाऱ्या, आम पचविणाऱ्या, दमा-त्वचाविकार यामध्ये पथ्यकर सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आमवात व दमा या दोन्ही त्रासांवर शेवग्याच्या शेंगा खायला हरकत नाही. उष्ण प्रकृती असणाऱ्या किंवा उष्णतेचे त्रास असणाऱ्या व्यक्‍तीने शेवग्याच्या शेंगा कमी प्रमाणात घेणे श्रेयस्कर असते. 
अपत्यामध्ये आनुवंशिक दोष येऊ नये यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने गर्भसंस्कार, विशेषतः गर्भधारणेपूर्वी पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे, प्रकृतीनुरूप औषधे घेऊन दोन्ही रोगांमध्ये सुधारणा करणे व नंतरच बाळासाठी प्रयत्न करणे चांगले. शिवाय, संपूर्ण गर्भारपणातही विशेष औषधे घेत राहणे हेसुद्धा आवश्‍यक. रोगाची तीव्रता किती आहे, दोन्ही रोगांसाठी काय स्वरूपाची औषधे घ्यावी लागतात याचा सारासार विचार करून वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य पाऊल उचलणे श्रेयस्कर. 

माझ्या दोन्ही पायांमध्ये गोळे येतात. वजन जास्त असले तर असा त्रास होतो का? कृपया मार्गदर्शन करावे. 
.... अर्चना 
 जास्त वजन आणि शरीरात वाढलेला वात या दोन मुख्य कारणांमुळे असा त्रास होऊ शकतो. यावर सर्वांत चांगला उपाय म्हणजे नियमित अभ्यंग. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’सारखे तेल जिरवून लावले तर वातही कमी होईल, वजनही कमी होईल. बरोबरीने ‘संतुलन वातबल गोळ्या’, प्रवाळपंचामृत, ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. नियमित चालणे, सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे हेसुद्धा चांगले. पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा बऱ्याचदा अपचनाशीही संबंध असू शकतो. यादृष्टीने जेवताना गरम पाणी पिणे, आहारात साजूक तुपाचा समावेश करणे, पचण्यास जड गोष्टी टाळणे हेसुद्धा चांगले. 

माझ्या आईला गेल्या दोन महिन्यांपासून शौचावाटे आव पडण्याचा त्रास होतो आहे. सकाळी एकदाच हा त्रास होतो, तिला इतर कोणताही त्रास नाही. कृपया मार्गदर्शन करावे. 
शौचावाटे आव पडणे हे अग्नी मंद असल्याचे एक लक्षण असते. तेव्हा दिवसभर प्यायचे पाणी उकळलेले व गरम पिणे चांगले. दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताज्या, घरी बनविलेल्या ताकात अर्धा चमचा जिरेपूड व चवीनुसार सैंधव मिसळून घेण्याचा उपयोग होईल. दोन चमचे बडीशेप एक ग्लास पाण्यात टाकून ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून, गाळून घेऊन दिवसातून एकदा घेण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर ‘बिल्वसॅन’ हा अवलेह एक- एक चमचा या प्रमाणात घेण्याचाही उपयोग होईल. हा त्रास बरा होईपर्यंत आहारातून तेल, गहू, जड कडधान्ये, बेकरीत तयार होणारी सर्व उत्पादने वर्ज्य करणेही श्रेयस्कर. 

मी सहा महिन्यांची गरोदर आहे. कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळण्यासाठी कृपया काही उपाय सुचवावा. मला कॅल्शियमच्या गोळ्या उष्ण पडतात व मी दूध घेऊ शकत नाही. 
... प्रियांका 
 गर्भारपणात खरेतर दूध घेणे अनिवार्य असते. सध्या ए2 म्हणून भारतीय वंशाच्या गाईचे शुद्ध दूध बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असते, ते घेता येते का हे पाहावे. दुधात ‘स्त्री संतुलन कल्प’ मिसळला तर ते पचण्यास अजूनच सोपे जाते असा अनुभव आहे. कॅल्शियमसाठी ‘कॅल्सिसॅन’ या गोळ्या घेता येतील. ‘सॅन रोझ’ हे रसायन घेण्याने कॅल्शियम तसेच रक्‍त वाढण्यासही मदत मिळेल. आहारात डिंकाचे लाडू (डिंक, खारीक, खसखस वगैरेंपासून बनविलेले लाडू), नाचणी सत्त्व, भिजविलेले बदाम यांचा समावेश करणे चांगले. 

माझे वय 30 वर्षे आहे. माझे केस खूप गळतात व पांढरेही होऊ लागले आहेत. तसेच, माझ्या मुलीचे केसही पिकत आहेत. संतुलनच्या हेअरसॅन या गोळ्या मी मध्यंतरी काही दिवस घेतल्या होत्या. या गोळ्या मुलीला दिल्या तरी चालेल का? 
..... गौरी 
हेअरसॅन गोळ्या घेण्यासाठी वयाचे बंधन नाही, त्यामुळे तुम्ही दोघीजणी या गोळ्या घेऊ शकता. बरोबरीने केसांना ताकद देणाऱ्या अनेक द्रव्यांनी संस्कारित केलेले संतुलनचे ‘व्हिलेज हेअर तेल’ आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा केसांना लावण्याचा उपयोग होईल. केस धुण्यासाठी किंवा इतर प्रसाधनाच्या निमित्ताने रासायनिक द्रव्यांचा अंतर्भाव असणारी उत्पादने टाळणे श्रेयस्कर. विशेषतः केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई, आवळा वगैरे द्रव्ये वापरणे किंवा तयार ‘संतुलन सुकेशा’ हे मिश्रण वापरणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर त्रिफळा, एक चमचा तूप व अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेण्याचाही उपयोग होईल. मुलीला हेच मिश्रण निम्म्या प्रमाणात देता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe