प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ear Sickness

माझ्या मुलीचा कान कुठल्याही प्रकारचा खोटा दागिना घातला की लगेच चिडतो व त्यातून रक्त यायला लागते. यासाठी काय उपाय करता येईल?

प्रश्नोत्तरे

माझ्या मुलीचा कान कुठल्याही प्रकारचा खोटा दागिना घातला की लगेच चिडतो व त्यातून रक्त यायला लागते. यासाठी काय उपाय करता येईल?

- सीमा बोरकर, सोलापूर.

उत्तर - त्वचा हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव होय. शक्यतो रोजच्या वापरामध्ये सोन्याचेच डूल घातलेले जास्ती बरे. कधीतरी हौस म्हणून काही तासांकरिता खोटा दागिना घातला तर ठीक. पण इतर बाबतीत जसे आपण सिंथेटिक गोष्टांचा वापर कमी करायला सांगतो तसे खोटे वा भेसळयुक्त दागिने घालण्याचे टाळणे जास्त बरे असते. रक्तामध्ये अशुद्धी असल्यामुळे बऱ्याचदा अनेकांचे कान चिडताना दिसतात. याकरता रक्ताच्या शुद्धीसाठी महामंजिष्ठादी काढा वा मंजिसार हे आसव तसेच मंजिष्ठासॅन वा अनंतसॅनसारख्या गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकेल. रोज दुधात घालून संतुलन अनंत कल्प घेण्याचाही फायदा होताना दिसतो. शरीरातील पित्तदोष कमी होण्याच्या दृष्टीने संतुलन पित्तशांती गोळ्या रोज सकाळ-संध्याकाळ घेण्याचा फायदा होईल. दागिना घालण्यापूर्वी वा घालून झाल्यानंतर संतुलन पादाभ्यंग घृतासारखे घृत कानाच्या पाळीला लावल्यास त्रास कमी होऊ शकेल वा त्रास होणारच नाही.

आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. गेली तीन वर्षे संततीसाठी प्रयत्न करूनही दिवस राहिले नाहीत. तपासण्या केल्या असता यजमानांच्या शुक्राणूची संख्या कमी असल्याचे तसेच मोटिलिटी कमी असल्याचे दिसते आहे. गेले वर्षभर त्यासाठी उपचार सुरू आहेत, पण फरक पडला नाही. दुसऱ्याचे (डोनेटेड) शुक्राणू घेऊन आयव्हीएफ करण्याचा प्रयत्न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे. आत्तापर्यंत केलेल्या आययूआय, आयव्हीएफ या दोन्ही उपचारांचा फायदा झाला नाही. काय करता येऊ शकेल?

- मंदाकिनी कांबळे, पुणे.

उत्तर - संतती होण्याकरिता शुक्रधातू व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचे आहे, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. यासाठी बीजशुद्धी व शुक्रवृद्धी या दोन्हींकडे लक्ष देणे आवश्यक असते. आयुर्वेदिक उपचारांचे आणि नियमांचे व्यवस्थित पालन केल्यानंतर बऱ्याच केसेसमध्ये उपयोग होताना दिसतो. ए२ दूध, घरचे साजूक तूप, आत्मप्राशसारखे रसायन, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी वगैरे शुक्रधातुपोषक गोष्टींची योजना घरी नक्की करावी. याचबरोबरीने रोज संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे, भिजवलेले पाच बदाम घेणे, संतुलन चैतन्य कल्प टाकून दूध घेणे, तसेच आयुर्वेदिक शुक्रधातुवर्धक उपायांची योजना करून घेण्याचा फायदा होताना दिसतो. तसेच बीजशुद्धीकरता संतुलनचे शास्त्रोक्त पंचक्रम करवून घेणेही उत्तम. तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन औषधोपचार सुरू केल्यास फायदा मिळण्याची शक्यता खूप जास्ती असू शकेल.