प्रश्नोत्तरे

माझे वय ४७ वर्षे आहे. काही दिवसांपासून मला झोप नीट लागत नाही. दिवसभर काम केल्यामुळे थकवा जरी जाणवत असला तरी झोप लागत नाही, लागली तरी मध्ये मध्ये जाग येते.
sickness
sicknesssakal

माझे वय ४७ वर्षे आहे. काही दिवसांपासून मला झोप नीट लागत नाही. दिवसभर काम केल्यामुळे थकवा जरी जाणवत असला तरी झोप लागत नाही, लागली तरी मध्ये मध्ये जाग येते. आजकाल मला स्वप्नसुद्धा जास्ती पडतात. यामुळे सकाळी उठल्यावर स्फूर्ती जाणवत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

- धनश्री काळे

उत्तर : शरीरात वात-पित्त दोष वाढलेले असले तर झोप न लागणे, स्वप्न पडणे यासारखे त्रास होताना दिसतात. पण आरोग्याच्या दृष्टीने शांत झोप लागणे हे महत्त्वाचे असते. झोप लागण्यासाठी झोपायला जाण्यापूर्वी अंगाला अभ्यंग तर पायांना पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल.

नाकामध्ये घरी बनवलेल्या साजूक तुपाचे किंवा नस्यसॅन घृताचे २-३ थेंब टाकणे, टाळूवर ब्रह्मलीन तेलाचे २-३ थेंब चोळणे हे सुद्धा चांगले.

रात्रीचे जेवण हलके आणि वेळेवर म्हणजे सूर्यास्तानंतर लवकरात लवकर करण्याचा तसेच झोपण्यापूर्वी २ चमचे रिलॅक्स सिरप घेण्याचाही उपयोग होईल. श्री गुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या आवाजातले योगनिद्रा संगीत ऐकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते असा अनुभव आहे.

माझा मुलगा 32 वर्षांचा आहे. कामानिमित्ताने त्याचा प्रवास खूप असतो, जेवणाच्या वेळाही अनियमित असतात. पण यामुळे दोन महिन्यांपासून त्याला शौचाला कडक आणि मूळव्याधीचा त्रास सुरू झालेला आहे. कधीतरी रक्तही पडतं. मला त्याची खूप काळजी वाटते. घरच्या घरी यावर काही उपाययोजता येतील का?

- अनुराधा कारळे

उत्तर - काळजी वाटणे स्वाभाविक असली तरी योग्य काळजी घेतली तर हा त्रास बरा होऊ शकणारा आहे. प्रवास केला तरी आहार प्रकृतीला अनुकूल योजता यायला हवा आणि जेवणाच्या वेळा अर्ध्या तासापेक्षा पुढे मागे होणार नाहीत याकडे लक्ष ठेवायला हवे.

विशेषतः दुपारचे जेवण १२ ते १ च्या दरम्यान आणि संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर करणे आणि अगदीच एखाद्या दिवशी उशीर झाला तर त्यादिवशी फक्त मुगाचे कढण किंवा फळभाज्यांचे पातळ सूप घेणे हे चांगले.

बरोबरीने जेवणानंतर चमचाभर सॅनकुल चूर्ण घेणे, आहारात ४-५ चमचे साजूक तुपाचा अंतर्भाव करणे, एक चमचा ताजे लोणी आणि खडीसाखर मिसळून खाणे हे सर्व श्रेयस्कर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com