प्रश्नोत्तरे question and answer fever child health tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 प्रश्न उत्तर

प्रश्नोत्तरे

प्रश्र्न १ : मी नियमितपणे फॅमिली डॉक्टर वाचते. त्यात तुम्ही दिलेले सल्ले मला मनासून आवडतात व त्यांचे पालन केल्याने फायदा होताना दिसतो. माझा नातू दोन वर्षांचा आहे, त्याचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. तो स्वभावाने खूप चंचल आहे पण तरीही कोणाशी बोलायला त्याला आवडत नाही. तो एका जागी बसून कुठलेही काम नीट करत नाही. डोळ्यांत डोळे घालून बघत नाही, व अजून एक वाक्यही बोलत नाही. काही सांगतिले तरी त्याकडे त्याचे फारस लक्ष नसते. त्याचे आई-वडिल त्याच्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण आपल्या बाजूने काही मदत होऊ शकते का?

... मीना प्रधान, पुणे

उत्तर : सध्या मुलांमध्ये अशा प्रकारचे त्रास अधिक प्रमाणात दिसू लागलेले आहेत. याचे कारण सध्याच्या सामाजिक परिस्थितामध्ये आहे. त्याचे कारण शोधून काढणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारच्या त्रासांमध्ये जितक्या कमी वयात उपचार सुरू केले जातील तेवढा अधिक फायदा होताना दिसतो.

रोज सकाळी संतुलन ब्रह्मलीन घृतासारख्या सिद्ध घृताचा अर्धा चमचा सकाळी अनाशेपोटी नातवाला नक्की द्यावा. सकाळी न्याहारीच्या वेळी संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत देणे चांगले. तसेच संतुलन बालामृत नातवाला नियमित चाटवावे. झोपण्यापूर्वी शक्य झाल्यास सॅन रिलॅक्स सिरपे देणे तसेच संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेल टाळूवर लावणे उत्तम.

नस्यसॅन घृताचे १-२ थेंब रात्री झोपण्याआधी नक्कीच, तसेच दिवसाही १-२ वेळा टाकणे उत्तम ठरेल. नातवाला रोज ॐकार गणेशसारखे स्वास्थ्यसंगीत ऐकवण्याचा फायदा होताना दिसेल. अशा प्रकारच्या त्रासांवर अनेक उत्तम औषधे आहेत, जी वैद्यांच्या सल्ल्याने सुरू करता येतील. यामध्ये आयुर्वेदिक उपचारांचाही (थेरपी) चांगला हातभार लागताना दिसतो.

यासाठी शिरोपिचू, नियमित संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलाने अभ्यंग करणे, पाठीच्या कण्याला संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल लावणे, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या बस्तीही करता येऊ शकतील. कार्ला येथील केंद्रात आलेल्या अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये चांगला फरक होताना आढळून आलेला आहे. वेळ वाया न घालवता जितक्या लवकर मुलाला उपचार सुरू करता येतील तेवढे त्याचे परिणाम जास्त पटकन व चांगल्या प्रकारे होताना दिसतात.

प्रश्र्न २ : माझा मुलगा दोन वर्षांचा आहे, त्याला सतत सर्दी-खोकला यांचा त्रास होत असतो. यासाठी बरेच उपाय करून पाहिले. त्याला अँटिबायॉटिक्स बऱ्याच वेळा देण्यात आली, पण तसे सतत देणे मनाला पटत नाही. रात्री त्याला खूप खोकला येतोत्यामुळे त्याला झोपही येत नाही

.... रेखा पंड्या, दिल्ली

उत्तर : लहान मुलांना सर्दी-खोकला होण्याचा त्रास बहुतेक वेळा दिसतो. त्याकरता आधीपासूनच मुलांच्या प्रतिकारक्तीवर काम करणे आवश्यक असते. त्यामुळे आम्ही जन्म झाल्यापासूनच मुलांना संतुलन बालामृत, संतुलन बाळगुटी द्यायला सांगतो, जेणेकरून मुलांची प्रतिकारशक्ती वाढून सर्दी-खोकला वा इतर संसर्गांपासून प्रतिबंध व्हायला मदत मिळू शकते.

सर्दी-खोकला झाल्यास त्यांना संतुलन सीतोपलादी चूर्णासारखे एखादे चांगल्या घटकद्रव्यांपासून तयार केलेले चूर्ण चांगल्या प्रतीच्या मधात मिसळून द्यावे. घरात रोज संतुलन टेंडरनेस धूप बाळाकरता केलेला चांगला. संतुलन ब्राँकोसॅन सिरप नियमाने रोज सकाळ-संध्याकाळ अर्धा-एक चमचा या प्रमाणात नक्की द्यावे. रात्री खोकला येत असल्यास आयुर्वेदात खूप चांगली औषधे आहेत ती वैद्यांच्या सल्ल्याने नक्की द्यावी.

एकूणच त्याची प्रतिकारशक्ती नीट राहण्याच्या दृष्टीने संतुलन च्यवनप्राशसारखे चांगल्या प्रतीचे च्यवनप्राश सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा देण्याचा उपयोग होऊ शकेल. रात्री झोपण्याआधी छातीवर संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल किंवा संतुलन अभ्यंग कोकोनट सिद्ध तेल हलक्या हाताने लावल्यास एकूण प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळू शकेल.

घरी जमत असल्यास थोडा ओवा सुती रुमालात बांधून, ती पुरचुंडी तव्यावर सुसह्य तापमानापर्यंत गरम करून, नाक व सायनसच्या भागी शेकल्यास हा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकेल.