Mumbai-Goa Highway : टोल वसुलीविरोधात ठाकरे गट आक्रमक; प्रशासनाला दिला थेट इशारा

सक्तीने टोल वसुली (Toll Collection) केल्यास शिवसेना Shiv (Sena Thackeray Group)आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवील.
Mumbai-Goa National Highway Toll
Mumbai-Goa National Highway Tollesakal
Summary

टोल वसुली होत असताना जिल्ह्यातील देवगड, वैभवाडी, कणकवली आणि मालवण तालुक्यातील काही भागातील वाहन चालकांना नहक त्रास सहन करावा लागेल.

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa National Highway) खारेपाटण ते झारापपर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र सेवारस्ते अर्धवट आहेत. शेतीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही, असे अनेक प्रश्न अधांतरी सोडून जिल्हावासीयांवर टोल लादला जात आहे.

याला आमचा शिवसेना (ठाकरे गट) म्हणून कायम विरोध राहील. सक्तीने टोल वसुली (Toll Collection) केल्यास शिवसेना Shiv (Sena Thackeray Group)आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवील, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिला.

Mumbai-Goa National Highway Toll
Kalyan Crime : पोलीस ठाण्याबाहेरच सासरच्या मंडळींनी विवाहितेचं फोडलं डोकं; पतीसह 6 जणांविरुध्द गुन्हा

पत्रकात म्हटले आहे, ‘‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणानंतर ओसरगाव येथे उभारलेल्या टोल प्लाजावर आजपासून (ता.१) टोल वसुली सुरू केली जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. बहुतांश प्रसिद्धी माध्यमांनी एक जून ही तारीख निश्चित करून ओसरगाव येथे टोल वसुली केली जाईल, असे प्रसिद्ध केले आहे.

या टोल वसुलीला शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या आदेशाने आंदोलन करणार आहोत. गेल्या पाच-सहा वर्षांत या चौपदरीकरणाचे काम झाले. झाराप ते खारेपाटण या ७० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्गाची चौपदरीकरणाचे काम झाले. २० टक्के काम अजूनही अपुरे आहे. या सगळ्या कामाबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली. त्यांना संपादनाचा मोबदला मिळालेला नाही.

Mumbai-Goa National Highway Toll
Kolhapur Crime : 'बोटं तोडली, आता तुला तोडणार..'; नंग्या तलवारी घेऊन थरारक पाठलाग, तरुणावर खुनी हल्ला

सेवा रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे अर्धवट रस्त्याचे काम असतानाही टोल वसुली होत आहे. टोल वसुली होत असताना जिल्ह्यातील देवगड, वैभवाडी, कणकवली आणि मालवण तालुक्यातील काही भागातील वाहन चालकांना नहक त्रास सहन करावा लागेल. जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरोसला असून येथे जिल्हा पातळीवरील सर्व शासकीय कार्यालय, रुग्णालय, न्यायालय, दैनंदिन व्यवहारासाठी जाणारे लोक हे चार तालुक्यातील जाणार आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी हा टोल द्यावा लागणार आहे.

Mumbai-Goa National Highway Toll
Satara : अभिमानास्पद! नव्या संसद निर्मितीत महाराष्ट्राची छाप; सातारच्या प्रकाशकडं सोपवलं फॅब्रिकेशनचं काम

हा भुर्दंड केवळ चार तालुक्यातील जनतेवरच का? जिल्ह्यातील अर्ध्या जनतेवर हा टोल लादला जात आहे. अनेक नागरिक मुख्यालयात सातत्याने जात असतात. त्यांच्यावर हा अन्याय आहे. हा भुर्दंड आम्ही सहन करणार नाही. आम्ही तुम्हाला जमिनी दिल्यात. लाख मोलाची मालमत्ता दिली. त्याचा मोबदला मिळाला असला तरी हा आमचा त्याग आहे. त्या त्यागातून हा राष्ट्रीय महामार्ग उभारला आहे. आमच्या लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.’’

Mumbai-Goa National Highway Toll
Good News : मडगावमधून 'या' दिवशी धावणार बहुचर्चित 'वंदे भारत एक्स्प्रेस'; कुठे-कुठे असणार थांबा? जाणून घ्या

शहरातील अनेक प्रश्न अधांतरी

टोल वसुली करत असताना शहरातील अनेक प्रश्न अधांतरी आहेत. गावातील सेवारस्ते पूर्ण झालेले नाहीत. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाणी शिरत आहे. महामार्गाचे नियोजन चुकीच्या पद्धतीने आहे. अनेक जणांना मोठा वळसा घालून फिरावे लागत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता जनतेने मोठा त्याग केला.

अशा जनतेवर टोल लावून महामार्ग प्राधिकरण काय सिद्ध करणार; मात्र गेल्या काही वर्षभरात सातत्याने टोल वसुलीच्या तारखा दिल्या जात आहेत. आता एक जूनला ही टोल वसुली सक्तीने केली तर शिवसेना आंदोलन पुकारेल, असा इशाराही श्री. पारकर यांनी आज दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com