esakal | सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी आयुर्वेदात चांगले उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

Health

सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी आयुर्वेदात चांगले उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मी ५० वर्षांची असून मला गेल्या १० वर्षांपासून वाताचा त्रास होतो. सर्व अंग दुखते. अंग दाबून घेतले की जरा बरे वाटते. डाव्या गुडघ्यामधली कूर्चा खूप झिजली आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

- दामिनी खंडागळे

उत्तर - बऱ्याच वर्षांपासून वाताचा त्रास होतो आहे, तेव्हा एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. तत्पूर्वी अंगाला संतुलन अभ्यंग सिद्ध तेल, गुडघ्यांना संतुलन शांती सिद्ध तेल लावण्यास सुरुवात करता येईल. सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी आयुर्वेदात चांगले उपाय असतात. विशेषतः वातशामक तेलाची बस्ती घेणे, स्थानिक बस्ती, विशेष लेप लावणे यांचा सुद्धा चांगला उपयोग होताना दिसतो. आहारात खारीक, खसखस, डिंकाचा लाडू, दूध यांचा समावेश करणे, खारकेच्या चूर्णाबरोबर उकळळेले दूध घेणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान ४-५ चमचे या प्रमाणात समावेश करणे चांगले. वातशमनासाठी संतुलन वातबल गोळ्या, संतुलन प्रशांत चूर्ण, दशमूलारिष्ट आसव घेण्याचाही फायदा होईल.

वयाच्या चाळिशीनंतर हळूहळू वजन वाढत असले तर काय करायला हवे ? असे वजन का वाढते ? कृपया मार्गदर्शन करावे.

- जाई केळकर

उत्तर - स्त्रियांच्या बाबतीत चाळिशीनंतर क्रमाक्रमाने वजन वाढण्यामागे स्त्री- असंतुलन, रजोनिवृत्तीचा काळ जवळ आल्याने स्त्री-संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे कारण असू शकते. त्यामुळे यावर मुळात स्त्री-संतुलनास मदत करणारे उपचार घेणे आवश्‍यक असते. यामध्ये फेमिसॅन तेलाचा पिचू वापरणे, नियमित अभ्यंग करणे, विशेषतः पोटावर किंवा ज्या ज्या ठिकाणी वजन वाढते आहे तेथे संतुलन अभ्यंग सिद्ध तेलासारख्या तेलाचा अभ्यंग करणे, नियमित चालणे, सकाळी १५-२० मिनिटांसाठी सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे, स्नानाच्या वेळी अंगाला मेदशामक द्रव्यांपासून तयार केलेले उटणे चोळून लावणे या उपायांचा फायदा होईल. दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास गरम पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते घेणे, सकाळी सामान्य तापमानाच्या पाण्याबरोबर एक चमचा मध घेणे या उपायांचाही वजन वाढू नये, वाढलेले वजन कमी व्हावे यासाठी उपयोग होईल. रात्रीचे जेवण वेळेवर आणि पचायला हलके, शक्यतो द्रव स्वरूपाचे असणे सुद्धा चांगले. एकंदर आरोग्य चांगले राहावे, वजन कमी व्हावे यासाठी चाळिशीच्या आसपास शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करुन घेणे सुद्धा उत्तम होय.

loading image
go to top