esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Question and Answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझे वय ४५ वर्षे आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून अंगावरून जास्ती जाते. आत्तापर्यंत २-३ वेळा रक्त थांबविण्याच्या गोळ्याही घ्याव्या लागल्या आहेत. सध्या हिमोग्लोबिन ९ पर्यंत कमी झालेले आहे, कृपया काही उपाय सुचवावा. या त्रासाला आणि त्यामुळे येणाऱ्या अशक्तपणाला मी फार कंटाळून गेले आहे.

...सौ. सीमा नांगरे

उत्तर - ३-४ वर्षांपासून त्रास होतो आहे, तेव्हा एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आवश्यक होय. तत्पूर्वी सकाळ-संध्याकाळ अशोक ॲलो सॅन या २-२ गोळ्या तसेच २-२ चमचे फेमिफिट सिरप घेण्यास सुरुवात करता येईल. एक चमचा पुष्यानुग चूर्ण मधात मिसळून वरून तांदूळ भिजवलेले पाणी पिण्यानेही हे सर्व त्रास कमी होतील. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहारात काळ्या मनुका, खजूर, अंजीर या गोष्टी ठेवणे चांगले. धात्री रसायन, सॅनरोझ सारखे रसायन घेणे हे सुद्धा उत्तम.

मला अधून मधून झोप न येण्याचा त्रास आहे. मात्र सॅन रिलॅक्स सिरप घेतले की मला छान झोप येते. मला विचारायचे आहे की माझ्या मुलीचा मुलगा दोन वर्षांचा आहे, त्याला कधी तरी गरज पडेल तसे हे सिरप दिलेले चालेल काय?

...सौ. अनुराधा परब

उत्तर - सॅन रिलॅक्स सिरप लहान मुलांना दिले तरी चालते. दोन वर्षांच्या बाळाला पाव ते अर्धा चमचा या प्रमाणात सिरप देता येईल. टाळूला ब्रह्मलीन तेल, अंगाला अभ्यंग सिद्ध तेल लावण्यानेही लहान मुलांना शांत झोप येते असा अनुभव आहे.

माझा नातू चार वर्षांचा आहे. मुलीने सुरुवातीपासून गर्भसंस्कार केलेले असल्याने त्याची तब्येत छान आहे. तो खूप हुशारही आहे. सध्या काही दिवसांपासून त्याचा एक कान खाजवतो आहे. या दिवसांमध्ये त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायला भीती वाटते. घरच्या घरी काही उपाय करण्यासारखा असल्यास कृपया सुचवावा.

... श्री. अशोकराव पाटोळे

उत्तर - कान खाजवण्याच्या त्रासावर औषधी द्रव्यांची धुरी घेण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. वावडिंग, हळद, कडुनिंबाची सुकलेली पाने, ओवा वगैरे द्रव्ये एकत्र करून किंवा तयार संतुलन प्युरिफायर धूप निखाऱ्यावर टाकून केलेला धूप यासाठी चांगला. वर्तमानपत्राचा शंकूसारखा आकार तयार करून मोठा भाग निखाऱ्यावरतर लहान भाग कानापाशी धरून धुरी घेता येते. यामुळे नाकातोंडात धुरी न जाता नीट कानाला धुरी मिळते. याप्रमाणे रोज एकदा २-३ मिनिटांसाठी धुरी दिली तरी बरे वाटेल.

loading image
go to top