प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nose
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाकाचे हाड वाढल्यामुळे माझी दोन वर्षांपूर्वी सर्जरी झालेली आहे. सध्या परत सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झालेला आहे, तसेच नाकाच्या हाडाच्या आकारात बदल झालेला आहे व दुखतेसुद्धा.

प्रश्नोत्तरे

नाकाचे हाड वाढल्यामुळे माझी दोन वर्षांपूर्वी सर्जरी झालेली आहे. सध्या परत सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झालेला आहे, तसेच नाकाच्या हाडाच्या आकारात बदल झालेला आहे व दुखतेसुद्धा. याकरता काही उपचार करता येतील का?

- मंगेश साप्ते

उत्तर : सर्दी-खोकल्याचा त्रास अनेकांना होताना दिसतो. असा त्रास कमी करण्यासाठी श्र्वसनसंस्थेची काळजी घेणे महत्त्वाचे असते. सकाळी व संध्याकाळी एक एक कप कोमट पाणी पिण्याचा फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी नस्यसॅन घृतासारख्या सिद्ध तुपाचे २-३ थेंब नाकपुड्यांत टाकावेत. अशा प्रकारच्या त्रासांमध्ये रोज दिवसातून दोन वेळा अर्धा-अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधात मिसळून घेतल्याचा तसेच आत्मप्राशसारखे रसायन घेतल्याचाही उपयोग होताना दिसतो. नाक दुखत असेल तर संतुलन रोझ ब्युटी तेल लावण्याचा उपयोग होऊ शकेल. नवजात बालकाचे नाक, तेल लावून हलक्या हाताने चोळून, आपण आकारात आणण्याचा प्रयत्न करतो तसे केल्यास कदाचित नाकाचा बदललेला आकार पूर्ववत होण्यास मदत होऊ शकेल.

माझी मुलगी १४ वर्षांची आहे, तिच्या डोक्यात सतत खाज येते. तिच्या डोक्यात कोंडा, उवा, लिखा काहीही नाही. डोके लाल वगैरे दिसत नाही. तिची अन्नावरती वासना पण गेलेली आहे. यासाठी काय करता येईल?

- सौ. आशा महाडिक

उत्तर - शरीरात पित्त वाढल्यास अशा प्रकारचे त्रास होताना दिसतात. अशा वेळी पित्तशामक उपाय करण्याचा उपयोग होतो. रोज धणे-जिऱ्याचे पाणी देण्याचा उपयोग होईल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ २-२ संतुलन पित्तशांती या गोळ्या देण्यानेही पित्त कमी व्हायला मदत मिळू शकेल. संतुलनचे स्त्री संतुलन कल्प कपभर दुधात घालून सकाळ-संध्याकाळ देणे, तसेच सॅनरोझसारखे रसायन देणे उत्तम ठरेल. केस धुण्याआधी आठवड्यातून १-२ वेळा कोरफडीच्या ताज्या गरात संतुलन पित्त हेअर पॅक मिसळून लावण्याचा तसेत संतुलन व्हिलेज हेअर तेल हलक्या हाताने केसांच्या मुळाशी चोळून लावण्याचा उपयोग होईल.

loading image
go to top