प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 3 February 2017

माझ्या घशाला सतत सूज येते. तसेच डोके कपाळाच्या ठिकाणी दुखते. ऍलोपॅथीच्या गोळ्या सोसवत नाहीत. कपाळावर सुंठ लावल्याने थोडे बरे वाटते. मला संधिवाताचा त्रासही आहे. मात्र अभ्यंग व शेक करण्याने त्रास कमी आहे. अभ्यंग दररोज करावा का? घशासाठी तीन-तीन वेळा सिंहमुद्रा, उज्जायी प्राणायाम करते. तसेच ॐकार अकरा वेळा म्हणते ते योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे. ..... शालिनी साळवे 

माझ्या घशाला सतत सूज येते. तसेच डोके कपाळाच्या ठिकाणी दुखते. ऍलोपॅथीच्या गोळ्या सोसवत नाहीत. कपाळावर सुंठ लावल्याने थोडे बरे वाटते. मला संधिवाताचा त्रासही आहे. मात्र अभ्यंग व शेक करण्याने त्रास कमी आहे. अभ्यंग दररोज करावा का? घशासाठी तीन-तीन वेळा सिंहमुद्रा, उज्जायी प्राणायाम करते. तसेच ॐकार अकरा वेळा म्हणते ते योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे. ..... शालिनी साळवे 
उत्तर - सिंहमुद्रा, प्राणायाम वगैरे श्वसनाच्या क्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेतलेल्या असाव्यात. केवळ वाचून किंवा पाहून करण्यामुळे अनेकदा दुष्परिणामही होताना दिसतात. मात्र दहा मिनिटे ॐकार म्हणणे किंवा ऐकणे आणि दहा मिनिटे अनुलोम-विलोम करणे चांगले. अभ्यंग रोज करणे उत्तम. अंगाला "संतुलन अभ्यंग सिद्ध तेल' आणि सांध्यांना "संतुलन शांती सिद्ध तेल' लावता येईल. घसा सुजतो, डोके दुखते त्यावर नियमितपणे सितोपलादी चूर्ण व मध हे मिश्रण घेण्याचा उपयोग होईल. गरम पाण्यात ओवा, तुळशीची पाने, गवती चहा, पुदिना यातील मिळतील ती द्रव्ये टाकून वाफारा घेण्याचाही फायदा होईल. 

मी रोज सकाळी योगासने करतो व संध्याकाळी चालायला जातो. माझे जेवण मोजके आहे. तरी सुद्धा मला सकाळी दोन-तीन जुलाब होतात. नाश्‍ता तसेच जेवण झाल्यानंतरही जुलाब होतात. मला कोणतेही व्यसन नाही. फक्‍त गॅसेसचा त्रास होतो. आल्या-लिंबाचा रस, रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा साजूक तूप वगैरे अनेक उपाय करून पाहिले; पण फरक नाही. कृपया मार्गदर्शन करावे. ....अविनाश मोहिते 
उत्तर - काही कारणांमुळे आतड्यांची ताकद कमी झाली तर असा त्रास होऊ शकतो. यावर दिवसातून दोन वेळा, जेवणानंतर किंवा नाश्‍त्यानंतर बिल्वावलेह किंवा "बिल्वसॅन' घेण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर कामदुधा गोळ्या तसेच वाटीभर ताज्या, गोड ताकात अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण मिसळून घेण्याचाही फायदा होईल. काही दिवस आहारातून गहू वर्ज्य करून त्याऐवजी ज्वारी, तांदूळ या धान्यांचा समावेश करणे, तसेच वांगी, ढोबळी मिरची, गवार, कोबी, फ्लॉवर, वाटाणा, चवळी, चणे, छोले वगैरे टाळणे श्रेयस्कर. 

माझी मुलगी 33 वर्षांची असून तिचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. परंतु तिला अजूनही मूल-बाळ नाही. नुकतीच तिची तपासणी केली तर त्यात स्त्रीबीज सुदृढ असल्याचे, तसेच बीजवाहिनी व्यवस्थित असल्याचे समजले. मात्र तिच्या अंडाशयाची शक्‍ती कमी पडत असल्याचे निदान झाले आहे. यासाठी तिला स्त्रीतज्ज्ञांनी आयव्हीएफ करण्यास सुचवले आहे. नैसर्गिक गर्भधारणेसाठी काय प्रयत्न करावेत? ...श्रीमती रत्नप्रभा 
उत्तर - गर्भधारणा होण्यासाठी तसेच नंतर टिकण्यासाठी आणि सुदृढ बालकाचा जन्म होण्यासाठी मुळात स्त्रीसंतुलन व्यवस्थित असणे महत्त्वाचे असते. अंडाशयाची शक्‍ती कमी असणे हे स्त्री संतुलन व्यवस्थित नसल्याचे एक लक्षण आहे. त्यामुळे कृत्रिम संप्रेरकांच्या मदतीने आयव्हीएफ करून घेणे हा यावरचा उपाय होऊ शकत नाही. अशा केसेसमध्ये आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम फायदा होताना दिसतो. विशेषतः शरीरशुद्धी करून उत्तरबस्ती करून घेणे, "संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव' घेणे, "फेमिसॅन तेला'चा पिचू वापरणे, "संतुलन अशोकादी घृत' घेणे वगैरे उपचारांचा चांगला उपयोग होताना दिसतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer