प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mental issue

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझे वय ३५ वर्षे आहे. मनात खूप विचार येतात, आतून कधीच शांत वाटत नाही. कामातही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नाही. बाकी तब्येतीची तक्रार नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

-पराग बाभळे

उत्तर : विचार करणे हे मनाचे एक कार्य सांगितलेले आहे. पण विचारांमध्ये, सुसूत्रता असणे, मन एका विषयावर केंद्रित होऊ शकणे यासाठी मनाची ताकद वाढवणे गरजेचे असते. यासाठी रोज सकाळी अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे, दिवसातून दोन वेळा सॅन ब्राह्मी गोळ्या घेणे, पाच मिनिटांसाठी दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करणे (ज्योतिध्यान करणे) याचा उपयोग होईल. योगासनेसुद्धा मुख्यत्वे मनावर, अग्निवर काम कणारी असतात. यादृष्टीने सकाळी १०-१२ सूर्यनमस्कार घालणे, मोकळ्या हवेत चालायला जाणे याचाही उपयोग होईल. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या आवाजातील ‘मम चित्तं स्थिरीकुरु’ हे मंत्रात्मक स्तोत्र ऐकण्यानेही बरे वाटेल.

माझ्या आईचे वय ६५ वर्षे आहे. तिला सांधेदुखीचा त्रास आहे, विशेषतः गुडघे खूप दुखतात. कधी कधी इतक्या वेदना होतात की ती रात्री झोपू शकत नाही. वेदनाशामक गोळ्या घेण्याचा त्रास होतो. कृपया काही उपाय सुचवावा.

- राधिका महाजनी

उत्तर : वाढलेला वात कमी करण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या दृष्टीने गुडघ्यांना व इतर सांध्यांनाही संतुलन शांती सिद्ध तेल लावणे उत्तम होय. योगराज गुग्गुळ, संतुलन वातबल सारखे औषध घेण्याचा, दशमूलारिष्ट घेण्याचाही उपयोग होईल. आहारात ४-५ चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, बाभळीचा डिंक, खारीक, भिजवलेले बदाम यांचे सेवन करणे सुद्धा आवश्यक. खूप वेदना असतील तेव्हा अगोदर तेल लावून वरून निर्गुडी किंवा एरंडाच्या वाफवलेल्या पानांना शेक करण्याने बरे वाटेल. चवळी, वाल, वाटाणे, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, गवार, वांगे वगैरे वातूळ गोष्टी आहारातून टाळणेसुद्धा श्रेयस्कर.

loading image
go to top