हिवाळा आणि व्हेरिकोज व्हेन्स 

डॉ. आशिष धडस 
Friday, 27 December 2019

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरू झाला की उभे राहणे, चालणेही अवघड होऊन जाते, त्यावर उपचार करण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू आहे. 

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरू झाला की उभे राहणे, चालणेही अवघड होऊन जाते, त्यावर उपचार करण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू आहे. 

हिवाळा आला आणि उबदार कपडे कपाटातून बाहेर येऊ लागले. अजून पुरेशी थंडी नसली तरी, व्हेरिकोज व्हेन्स किंवा स्पायडर व्हेन्स यांचा त्रास वाढायला ती खूप आहे. त्यामुळे उबदार कपडे घातल्यावर दिसायला फार बऱ्या नसलेल्या आणि वेदनादायी स्पायडर व्हेन्स आणि पायावरील व्हेरिकोज व्हेन्स लपविण्यासाठी थोडाफार फायदा होतो. पुन्हा उन्हाळा आल्यावर तुम्हाला तुमचे आवडते आखूड कपडे घालायला आवडेल. आपले व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासपूर्ण होण्यासाठी आपल्याला आवडते कपडे घालता येणे अत्यंत आवश्यक असते. पण त्यावेळी व्हेरिकोज व्हेन्स किंवा स्पायडर व्हेन्सच्या जाड्या निळ्या रेषा लपवणे कठीण जाते. 

व्हेरिकोज व्हेन्स असलेली माणसे या त्रासाला कंटाळलेली असतात आणि त्यावर उपचार कसा करता येईल, हे जाणून घेण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असतात. तुमच्या पायावर दिसणाऱ्या त्या कुरूप नसांमागचे कारण आणि त्यावरील उपचार यांची माहिती आम्ही या लेखाद्वारे देत आहोत. 

जर तुम्ही व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार पुढे ढकलत असाल, तर हिवाळा संपण्यापूर्वी हा निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे तुमची निश्चित अशी कारणे असतील. तज्ज्ञ डॉक्टर वर्षातील कोणत्याही काळात ही प्रक्रिया करू शकत असले तरी व्हेरिकोज व्हेन्सचा आजार हिवाळ्यात सुलभतेने बरा होतो, असा रुग्णांचा अनुभव आहे आणि ही प्रक्रिया हिवाळ्यात करून घेण्याला रुग्ण प्राधान्य देतात. तुम्ही कम्प्रेशन सॉक्स घातले आणि हिवाळ्यात तुमच्यावर उपचार केल्यानंतर यूव्ही किरणे टाळली तर उन्हाळ्यात तुमचे पाय उत्तम दिसतील. 

या नसा एवढ्या फुगीर आणि दृश्य का असतात? त्याची कारणे जाणून घ्यायला हवीत.जेव्हा नसा त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीत, तेव्हा व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास उद्‍भवतो. जेव्हा रक्त नसांमधून वाहते, तेव्हा कपाच्या आकाराच्या झडपा रक्त वाहण्यासाठी उघडतात आणि ते परत मागे येऊ नये म्हणून बंद होतात. जेव्हा या झडपा निकामी होतात तेव्हा रक्त हृदयाच्या दिशेने जाण्याऐवजी पायांमध्ये साचत जाते. एका झडपेतून दुसऱ्या झडपेत जाण्याऐवजी रक्त त्या नसेमध्ये साचते, नसेवरील दाब वाढतो आणि तिथे रक्तसंचय होऊन नस फुगते. 

पायावर किंवा उदरावर अतिरिक्त दाब पडला तर त्याची परिणती व्हेरिकोज व्हेन्समध्ये होते. पूर्वी पायाला इजा झाली असेल तर खोल व्हेनस थ्रॉम्बोसिस होऊ शकतो. त्यामुळेही पुढे जाऊन झडपेचे नुकसान होते आणि व्हेरिकोसायटिस होतो. मांडी घालून बसल्याने व्हेरिकोज व्हेन्सचा आजार होतो हा गैरसमज आहे; पण आधीपासून हा आजार असेल तर मांडी घालून बसल्याने तो बळावतो. 

तुम्ही त्यापासून मुक्ती कशी मिळवाल? कोणते उपचार करता येतील? 
· शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. तुमच्या पायाचे स्नायू मजबूत करा आणि रक्ताभिसरणामध्ये सुधारणा करा. यासाठी तुम्ही धावणे, ब्रिस्क वॉकिंग किंवा नृत्य करण्याचा पर्याय निवडू शकता. लक्षात ठेवा, या अॅक्टिव्हिटी प्रमाणापेक्षा जास्त करू नका. 
· वजनावर नियंत्रण ठेवून निरोगी राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पाय, गुडघे आणि पावलांवर अतिरिक्त दाब पडणार नाही. 
· स्टिलेट्टोस फार वेळ घालू नका. फार वेळ मांडी घालून बसू नका आणि फार वेळ उभे राहणार असाल तर थोड्या थोड्या वेळाने तुमचे वजन एका पायावरून दुसऱ्या पायावर द्यावे. 

प्रत्येक रुग्ण वेगळा असतो आणि प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते आणि आजारापासून दिलासा देण्यासाठी नसांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशिष्ट उपचारांची गरज असते. एकच उपचार किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेचे कॉम्बिनेशन वापरणे गरजेचे असते. क्रायो लेझर अँड क्रायो स्क्लेरोथेरपी ही त्या विशिष्ट ठिकाणी भूल देऊन करण्यात येणारी वेदनारहित शस्त्रक्रिया आहे. लेझरच्या साइटवर किंवा सुईच्या माध्यमातून बर्फासारख्या थंड हवेचा फवारा मारण्यात येतो आणि रुग्णाची अस्वस्थता काढून टाकण्यात येते. बहुतेक रुग्णांना हे उपचार घेताना फारच थोडी वेदना होते. चार-सहा तासांत रुग्ण कामावर परत जाऊ शकतो. व्यायाम करण्याची मुभा चौवीस तासांनी देण्यात येते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scelotheropy article written by Dr Shree Balaji Tambe