
दररोज ३ कप Coffee प्यायल्याने होतो हृदयाला फायदा
Daily Coffee can benefit the Heart : कॉफी पिणे अनेकांना आवडते. दिवसाची सुरूवात अनेकजण कॉफीनेच करतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार दिवसातून दोन-तीन कप कॉफी पिणे हृदयासाठी चांगले असतेय अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या 71 व्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात सादर याविषयी अभ्यास सादर करण्यात आला. संशोधकांच्या मते, या अभ्यासात कॉफीचा हृदयविकार आणि मृत्यूशी काय संबंध आहे हे शोधण्यात आले आहे
हेही वाचा: मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे
अभ्यासात काय आढळले?
या अभ्यासातून कॉफीचा हृदयविकाराशी संबंध नसून ती हृदयाच्या सुरक्षेसाठी काम करते, असे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील बेकर हार्ट इन्स्टिट्यूटमधील पीटर एम. किस्लर, एमडी आणि अभ्यासाचे वरिष्ठ लेखक पीटर एम. किस्लर यांच्या मते, कॉफीमुळे हृदयाची गती वाढते, काही लोकांना वाटते की यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कॉफी किती प्यावी यासाठी आरोग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता. किस्लर यांच्या मते, आमच्या डेटानुसार हृदयासंबंधी समस्या असलेले आणि निरोगी लोकांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात कॉफीचा समावेश करायला हवा. कॉफी एकतर लाभ देते किंवा तटस्थ परिणाम देते, असे आम्हाला आढळले आहे. म्हणजे एकतर हृदयाला फायदा होईल किंवा असे झाले नाही तर नुकसान होणार नाही.
हेही वाचा: Patiala Peg : शहराच्या नावाने का ठेवले मद्याचे नाव! काय आहे स्टोरी

coffee
निरोगी लोकांवर प्रभाव
पहिल्या अभ्यासात संशोधकांनी ३ लाख ८२ हजार ५३५ व्यक्तींचा अभ्यास करून त्यांचा डेटा तपासला. यात ५७ वर्षांची लोकं सहभागी झाली होती. त्यापैकी निम्म्या महिला होत्या. दिवसातून दोन-तीन कप कॉफी प्यायल्याने सर्वाधिक फायदे होतात, असे संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनरी हृदयरोग, किंवा कोणत्याही कारणामुळे मृत्यू होण्याचा धोका १० ते १५ टक्क्यांनी कमी होतो. जे लोक दररोज एक कप कॉफी पितात त्यांना स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित मृत्यूचा धोका कमी असतो, असेही संशोधनात आढळले आहे.
हेही वाचा: माठातून पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! आयुर्वेदानुसार महत्व वाचा!
Web Title: 3 Cup Coffee Benefits Good News For Coffee Lovers Daily Coffee Can Benefit The Heart
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..