कॉफी आवडते! तीचे तीन फायदे वाचाच

फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी याविषयी अभ्यास केला
coffee
coffee

कॉफी प्यायला अनेकांना आवडते. कॉफी प्यायल्यामुळे होणारे फायदे-नुकसान याविषयी अनेक गोष्टी वाचायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे कॅफीन(Caffeine) युक्त पेय प्यावे की नाही हे ठरवणे कठीण आहे? एका अभ्यासात (Study) असे सांगण्यात आले आहे की कॉफी (Coffee) प्यायल्याने पचनशक्ती आणि आतड्यांवर सकारात्मक परिणाम (Benefits) होतो. तसेच पित्ताशयातील खडे आणि यकृताच्या अनेक आजारांपासून बचाव होतो. फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी याविषयी अभ्यास (Study) केला होता. या अभ्यासाचे निष्कर्ष 'न्यूट्रिएंट' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. या नवीन अभ्यासात यापूर्वी प्रकाशित झालेल्या १९४ अभ्यासांचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार, कॉफीच्या मर्यादित सेवनाने पचनसंस्थेशी संबंधित शरीराच्या (Body) अवयवांना कोणतेही नुकसान होत नाही. चांगल्या आरोग्यासाठी (Health) दररोज ३ ते ५ कप कॉफी घेणे चांगले असते.

coffee
सकाळी Body Stretching केल्याचे फायदे जाणून घ्या

असा केला अभ्यास

नवीन अभ्यासात, कॉफी इतर अनेक रोगांपासून संरक्षण देते, ज्यामध्ये हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, यकृताचा सर्वात सामान्य कर्करोग असल्याचे समर्थन करतो. कॉफी पचनाच्या पहिल्या टप्प्यात मदत करत असल्याचा पुरावा असूनही, बहुतेक डेटा कॉफीचा गॅस्ट्रो-एसोफेजल रिफ्लक्सवर थेट परिणाम होतो, असे खात्रीलायक सांगत नाही. लठ्ठपणा आणि खराब खाण्याच्या सवयी यांसारख्या घटकांचा एकत्रित परिणाम असू शकल्याचे त्यात म्हटले आहे.

coffee
सकाळी उठल्या उठल्या ही चार पानं खा! मधुमेह, उच्च रक्तदाबापासून आराम मिळवा

अभ्यासाविषयी तज्ज्ञ काय सांगतात?

हा अभ्यास करणारे फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड मेडिकल रिसर्चचे संचालक अॅस्ट्रिड नेहलिग म्हणतात, काही गृहितकांच्या विरूद्ध, कॉफीचा पोटाशी किंवा पचनाच्या समस्यांशी संबंध नाही. काही काही वेळा कॉफी बद्धकोष्ठतेसारख्या (Constipation) समस्येशी लढून बचाव करते. काही डेटा असे सूचित करतो की कॉफी आतड्यांतील बायफोडोबॅक्टेरिया सारख्या जीवाणूंची पातळी वाढवते, पण, संपूर्ण पचन तंत्रावर कॉफीचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.

coffee
मटार सॅंपल खाल्लत का? नाश्त्यासाठी आहे मस्त पदार्थ
coffee
coffeeesakal

कॉफी पिण्याचे तीन फायदे

१) कॉफी जठरासंबंधी, पित्तविषयक आणि स्वादुपिंडाच्या स्रावांशी संबंधित आहे, जे अन्नाच्या पचनासाठी आवश्यक आहे. कॉफी हे पाचक संप्रेरक गॅस्ट्रिनचे उत्पादन आणि गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये उपस्थित हायड्रोक्लोरिक ऍसिडचे उत्पादन उत्तेजित करते. हे दोन्ही पदार्थ पोटातील अन्नघटक तोडण्यास मदत करतात.

२) कॉफीमुळे आतड्याच्या मायक्रोबायोटाची रचना बदलते. अभ्यासात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये असलेल्या बिफिडोबॅक्टेरियाच्या संख्येवर कॉफी प्यायल्याने परिणाम होतो, असे आढळून आले आहे.

३) कॉफी कोलन मोटीलिटीशी संबंधित आहे, अन्न पचनमार्गातून जाण्याची प्रक्रिया असते ही. कॉफीमुळे कोलन मोटीलिटी वाढते. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा धोकाही यामुळे कमी होतो.

coffee
सकाळी कॉफी प्या, डोळे चांगले ठेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com