esakal | नेहमीचे साधे पोहे खाऊन कंटाळलात? मग जरुर ट्राय करा आचारी पोहे
sakal

बोलून बातमी शोधा

world pohe day.jpg

साधे पोहे खाऊन कंटाळलात? मग जरुर ट्राय करा आचारी पोहे

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे (poha). आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी नाश्त्यासाठी पोहेच केले जातात. परंतु, अनेकदा नेहमीचे साधे पोहे खाऊन अत्यंत कंटाळा येतो.त्यामुळे एका ठराविक काळानंतर हे पोहे नकोसे वाटतात. त्यामुळे अनेक स्मार्ट गृहिणी या पोह्यांमध्ये काही किरकोळ पण चविष्ट बदल करतात आणि पोह्यांची नवीन डिश आपल्यासमोर सादर करतात. विशेष म्हणजे आज जागतिक पोहे दिवस (World Poha Day) आहे. त्यामुळेच या दिनाचं निमित्त साधत पोह्यांची आणखी एक भन्नाट आणि चटपटीत रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे जाणून घेऊयात आचारी पोह्यांची रेसिपी. (achari-poha-will-be-best-for-breakfast-know-its-recipe)

हेही वाचा: जागतिक पोहे दिन : या दिवसाबद्दल तुम्हाला माहितीये का?

साहित्य -

जाड पोहे - २ वाट्या

कोबी - अर्धा वाटी

मटार - अर्धा वाटी

कांदा - अर्धा वाटी

टोमॅटो - अर्धा वाटी

उकडलेला बटाटा - अर्धा वाटी

शेंगदाणे - अर्धा मूठ

लाल मिरच्या - दोन

लोणच्याचा खार - दोन चमचे

मीठ , तिखट - चवीनुसार

फोडणीसाठी लागणारं साहित्य

कृती -

प्रथम पोहे चाळणीत घेऊन ते हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका बाजूला त्यातील पाणी निथळत ठेवा. पोह्यांमधील पाणी पूर्णपणे गेल्यानंतर ते हाताने मोकळे करुन घ्या. आता कोरड्या झालेल्या पोह्यांवर दोन चमचे लोणच्याचा खार घाला व व्यवस्थित मिक्स करुन घ्या. ( तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही लोणच्याचा खार घेतला तरी चालेल.)

गॅसवर एक कढई ठेऊन त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने, लाला मिरच्या, हळद, हिंग घालून छान खमंग फोडणी करुन घ्या. त्यानंतर त्या कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कोबी, मटार, शेंगदाणे घालून सगळं मिक्स करा. सगळ्या भाज्या मिक्स झाल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, टोमॅटो अॅड करा. त्यानंतर लोणच्याचा खार लावलेले पोहे यात मिक्स करा आणि एक वाफ काढा. अशा प्रकारे आचारी पोहे तयार.

loading image
go to top