
Adulteration in Saffron: केशरमधील भेसळ कशी ओळखायची? जाणून घ्या सोपा मार्ग
Adulteration in Saffron: केशरकडे लक्झरी मसाला म्हणून पाहिले जाते. केशरचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. जेवणासह त्वचेसाठी केशर वापरला जातो. पण खरा केशर ओळखणे खूप कठीण आहे. कधी कधी केशर आपल्याला काही ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध होतो. केशर स्वस्त असल्यामुळे आपणही खरेदी करतो. परंतु तुम्ही खरेदी केलेला केशर खरा असेलच असे नाही, हा केशर बनावट किंवा भेसळयुक्त असू शकतो. तुम्हालाही खऱ्या आणि नकली केशरबद्दल संभ्रम असेल तर तो कसा ओळखायचा, ते आपण जाणून घेणार आहोत. ते ओळखण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही केमिकल वापरण्याची गरज नाही, तुम्ही ते पाण्याच्या मदतीने ओळखू शकता.
हेही वाचा: वजन कमी करायचंय? मग करा आंब्याचं सेवन
खरा केशर कसा ओळखावा?
1. एका काचेच्या भांड्यात 70-80 अंशांपर्यंत गरम पाणी घ्या.
2. त्यात थोडं केशर टाका.
3. केशरमध्ये भेसळ असेल तर त्याचा भगवा रंग पाण्याने निघून जाईल.
4. भेसळयुक्त केशर लगेचच पाण्यात रंग सोडून देईल आणि हळूहळू त्याचे धागे तुटू लागतील.
हेही वाचा: हिवाळ्यात केशर खाण्याचे आरोग्यासाठी फायदे
बनावट केशर धोकादायक का आहे?
अभ्यासानुसार, भेसळयुक्त गोष्टी केवळ चवीनुसारच भिन्न नसतात, परंतु त्या इतक्या विषारी असतात की त्यांच्यामुळे हृदय निकामी होणं, यकृत निकामी होणे, किडनीचे आजार आणि त्वचेची ऍलर्जी यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. केशरच्या बाबतीत, भेसळ अधिक धोकादायक असू शकते कारण रंग बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या केशरसारखी चव देण्यासाठी त्यात अनेक रसायने वापरली जातात.
Web Title: Adulteration In Saffron Is Saffron Real Or Fake Identify This Easy Way At Home
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..