esakal | वजन कमी करायचंय? मग करा आंब्याचं सेवन

बोलून बातमी शोधा

Hapus-Mango
वजन कमी करायचंय? मग करा आंब्याचं सेवन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

उन्हाळा आला की बाजारात विविध फळांची रेलचेल पाहायला मिळते. आंब्यापासून ते ताडगोळ्यांपर्यंत अनेक रसदार फळं या दिवसांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे उन्हाळा वातावरणाच्या बाबतीत कितीही त्रासदायक ठरत असला तरीदेखील या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फळांमुळे तो सुसह्य होतो. त्यातच एप्रिल-मे महिन्यामध्ये सगळ्या बाजारपेठांमध्ये आंबे दिसू लागतात. हापूस आंबा, पायरी आंबा अशा आंब्यांच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक प्रजातीप्रमाणे आंब्याची चव वेगवेगळी असते. परंतु, त्यात असणारे गुणधर्म मात्र सारखे असतात. चवीने गोड, सुवासिक असणारा आंबा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. विशेष म्हणजे आंब्यामुळे उन्हाळ्यात होणारे उष्णतेचे विकार कमी होतात. त्यामुळे आंबा खाण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहुयात.

आंबा खाण्याचे फायदे

१. पिकलेला आंबा खाल्ल्यामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात.

२. मलावस्तंभाचा त्रास कमी होतो.

३. आंबा शक्तीवर्धक व उत्साहवर्धक आहे.

४. वजन वाढते.

हेही वाचा: आंबा गोड आहे की नाही कसं ओळखाल? जाणून घ्या सोपी युक्ती

५. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

६. आंब्यामुळे स्मरणशक्ती वाढते. तसंच मेंदू तल्लख होतो.

७. त्वचेचा पोत सुधारतो.

८. आतड्यांशी निगडीत समस्या दूर होतात.

९. उष्णतेचे विकार कमी होतात. मात्र, आंब्याचं प्रमाणेपेक्षा जास्त सेवन करु नये.