Diwali Festival 2020 अशी बनवा खुसखुशीत खमंग चकली

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 12 November 2020

चकली हा एक दिवाळीच्या फराळातील तसाच चहाबरोबर खायचा एक खमंग स्नॅक आहे. चकलीसाठी लागणारे पीठ म्हणजेच चकळीची 'भाजणी' बाजारात विकत तर मिळतेच पण घरी बनवायला अवघड नाही.

चकली हा एक दिवाळीच्या फराळातील तसाच चहाबरोबर खायचा एक खमंग स्नॅक आहे. चकलीसाठी लागणारे पीठ म्हणजेच चकळीची 'भाजणी' बाजारात विकत तर मिळतेच पण घरी बनवायला अवघड नाही.

मात्र ही भाजणी अगदी बारीक दळलेली असायला हवी. त्यासाठी घरी प्रोफेशनल क्वालिटीचा मिक्सर नसेल तर सगळी धान्यं घरी भाजून मग एखाद्या गिरणीतून दळून घ्यावीत.

साहित्य काय लागेल?

 • भाजणीचे पीठ साठी लागले ली सामग्री

 • 4 गिलास तादुळ

 • 2 गिलास चना दाळ

 • 1 गिलास तुअर दाळ

 • 1 गिलास मसुर दाळ

 • 1 गिलास मुग दाळ

 • 1 गिलास उळद दाळ

 • 1 वाटी खडे धने

 • 1/2 वाटी जीरा

 • 2 टेबल स्पुनओवा

 • 2 टेबल स्पुन तीळ

 • 2 टेबल स्पुन तिखट

 • 2 1/2 टेबल स्पुन मीठ

 • 1 टेबल स्पुन हळद

 • तळण्यासाठी तेल

 • 1 गिलास पोहा

 

नांदेड : दिवाळीत फराळाला महागाईचा खमंग तडका - Diwali Festival 2020 Inflation Erupts Nanded News | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal
कसं कराल?

 • सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुऊन चांळणी मध्ये काढून घ्या, आणि एका स्वच्छ कपड्यात पसरून द्या पंख्याखाली छान सुकु द्या
 • तांदुळ आणि दाळ सुकले की एका कढईत छान भाजून घ्या
 • धने आणि जीरा पण भाजून घ्या त्यानंतर पोहे पण भाजा। सगळ्यात थंड झाला की एकत्र करून घ्या
 • चकलीची भाजणी तयार आहे आता याच्या पीठ तयार करून आपण चकली बनवणे, चकली बनवण्यासाठी पीठात तीळ,ओवा तिखट,मीठ,हळद टाकून घ्या जर तुम्ही तीन गिलास पीठ घेतला असेल तर त्यात तीन चमचा तेल किंवा तूप टाकून मोहन द्या, आता थोडा थोडा पाणी टाकून भिजून घ्या
 • तोपर्यंत एका कढईत तेल गरम करायला ठेवा, आता चकल्या तयार करून तेल गरम झाले की त्यात चकल्या टाकून तळून घ्या
 • खुसखुशीत खमंग भाजणीची चकली तयार आहे

  (संपादन - विवेक मेतकर,अकोला)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Diwali Festival 2020 How to make Chakli?