
History of paella in Spanish cuisine: पाएया हा एक भाताचा प्रकार असून तो स्पेनची खासियत मानला जातो. हा चविष्ट भात स्पेनबरोबरच जगातील इतर देशांतील लोकही मोठ्या आवडीने खातात. पाएयाचा उगम स्पेनमधील वॅलेंसिया प्रांतातला मानला जातो. वॅलेंसियाच्या आसपास संत्री, सफरचंद व ऑलिव्हच्या अनेक बागा असून तेथे मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते.
पूर्वी भाताच्या शेतात काम करणारे शेतकरी एकत्र येऊन त्यांचे दुपारचे जेवण बनवायचे. ते शेतावरील मोकळ्या जागी संत्री आणि ऑलिव्हची लाकडे पेटवून त्यावर एक प्रकारचा भात शिजवायचे. बहुतेक वेळा ते परातीसारख्या मोठ्या पसरट भांड्यात भात बनवायचे. त्यात शेतातला तांदूळ, तिथे लावलेल्या टोमॅटो, कांदे, बीन्स अशा भाज्या व बदक किंवा गोगलगायींचे मीट घातले घालायचे.