स्ट्रीट फूड खायची इच्छा होतीये? मग ट्राय करा आलू हंडी चाट

नक्की ट्राय करा झटपट होणारी आलू हंडी चाट रेसिपी
स्ट्रीट फूड खायची इच्छा होतीये? मग ट्राय करा आलू हंडी चाट
social media

कोरोना काळात प्रत्येक जण बाहेरील पदार्थ खाणं शक्यतो टाळत आहे. मात्र, आपल्या प्रत्येकालाच मसालेदार, तळलेले पदार्थ, चाट खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे प्रयत्न केला तरीदेखील हे पदार्थ खाण्याचा मोह काही आवरत नाही. म्हणूनच, हे पदार्थ घराबाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच तयार केले तर कधीही उत्तमच. म्हणूनच, घरच्या घरी आलू हंडी चाट कसा तयार करायचा ते पाहुयात. (aloo-chaat-recipe-will-fulfil-all-your-street-food-cravings-ssj93)

स्ट्रीट फूड खायची इच्छा होतीये? मग ट्राय करा आलू हंडी चाट
आइस्क्रीम खाण्याची इच्छा होतीये? नक्की ट्राय करा पनीर कुल्फी

साहित्य -

बटाटे - २ मोठे

भिजवलेले वाटाणे -१ वाटी

कांदा - १

टोमॅटो -१

आलं-लसूम पेस्ट - १चमचा

धणेजिरे पूड - अर्धा चमचा

चाट मसाला -१ चमचा

तिखट, हळद - २ चमचे

कोथिंबीर

मीठ - आवश्यकतेनुसार

दही

बारीक शेव

तेल

कृती -

प्रथम रात्रभर भिजवलेले वाटाणे आणि बटाटे छान शिजवून घ्या. त्यानंतर शिजलेले वाटाणे व बटाटा स्मॅश करुन घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून छान परतून घ्या. आता यात लसूण पेस्ट, धणेजिरे पूड, तिखट, हळद, चाट मसाला, मीठ घाला व मसाला तयार करा. त्यानंतर तयार मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात स्मॅश केलेला बटाटा व वाटाणे घाला व छान मिक्स करा. तयार चाट सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, दही व बारीक शेव घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com