आइस्क्रीम खाण्याची इच्छा होतीये? नक्की ट्राय करा पनीर कुल्फी

मोजक्या साहित्यात बनवा पनीर कुल्फी
आइस्क्रीम खाण्याची इच्छा होतीये? नक्की ट्राय करा पनीर कुल्फी

अनेकांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्याला पनीर अपवाद आहे. दूध न आवडणारीही लोकंही पनीर आवडीने खातात. कोणत्याही पदार्थात पनीरचे काही तुकडे घातले की त्या पदार्थाची चव दुप्पट होते. आज काल पनीरपासून तयार केलेल अनेक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. यात पालक पनीर, पनीर बटर मसाला, पनीर कटलेट, पनीर सॅण्डविच, पनीर सॅलेड असे असंख्य पदार्थ पनीरपासून तयार केले जातात. परंतु, आज आपण पनीरपासून कुल्फी कशी तयार करावी हे जाणून घेणार आहोत. (indian-paneer-kulfi-recipe-ingredients-and-method-ssj93)

साहित्य -

दूध - १ लीटर

पनीर - १ कप किसून

साखर - चवीनुसार

गुलाब इसेन्स - २ टी स्पून

बदाम, काजूची पेस्ट - २ चमचे

गुलाबाच्या पाकळ्या

रोज सिरप - २ चमचे

आइस्क्रीम खाण्याची इच्छा होतीये? नक्की ट्राय करा पनीर कुल्फी
Video : अधिवेशनात थेट उंदराची एण्ट्री!

कृती -

प्रथम एक जाड बुडाचं पातेलं घेऊन त्यात मंद आचेवर दूध आटवून घ्या. त्यानंतर या दुधामध्ये काजू- बदामाची पेस्ट टाका. आता हे दूध छान मिक्स करा व हळूहळू साखर (साखरेचं प्रमाण आवडीनुसार ठरवा) घाला. साखर घालत असताना दूध सतत ढवळत रहा. त्यानंतर साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर ३-४ मिनीटे उकळवा. ४ मिनीटांनी गॅस बंद करा आणि दूध गार होण्यासाठी ठेवा. दूध थंड झाल्यावर त्यात किसलेलं पनीर आणि गुलाब इसेन्स टाका. आता ब्लेंडरने हे दूध पुन्हा घुसळून घ्या. त्यानंतर ९ तास हे दूध फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. ( कुल्फी ट्रे असेल तर त्यात मिश्रण भरुन सेट करा.) तयार आइस्क्रीम सेट झाल्यावर त्यावर रोज सिरप घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com