esakal | Aloo Handi Chaat Recipe:याची टेस्ट एकदा कराच
sakal

बोलून बातमी शोधा

Aloo Handi Chaat Recipe:याची टेस्ट एकदा कराच

Aloo Handi Chaat Recipe:याची टेस्ट एकदा कराच

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

रोज तेच तेच जेवण करायला नको वाटते. अशावेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यावेळी झटपट कोणती रेसिपी बनवायची असा प्रश्न पडतो. मग यावेळी आलू हंडी चाट रेसिपी एकदा घरी बनवून पाहाच. ही एक अतिशय इनोवेटिव चाट रेसिपी आहे. ज्यात उकडलेले छोले आणि चटणीची चव बटाटाच्या कपमध्ये मिसळली जाते.

हेही वाचा: टेस्टी आणि हेल्दी ऑईल फ्री पालक पकोड्याची झटपट रेसिपी पाहाच

साहित्य:

- काळा हरभरा- 150 ग्रॅम

- उकडलेले बटाटे- 500 ग्रॅम

- चिंचेची चटणी- २ चमचे

- पुदीना चटणी- १ चमचा

- दही- २ चमचे

- चाट मसाला- १ चमचा

- भाजलेला जिरे पूड- १ टीस्पून

- कांदे- 2 मोठे तुकडे केलेले

- टोमॅटो- 2 मोठे चिरलेले

- शेव / भुजिया- १ टेस्पून

- कोथिंबीर सजवण्यासाठी

- चवीनुसार मीठ

- लाल मिरची चवीनुसार

- अमचूर पावडर- १ चमचा

हेही वाचा: Crispy cumin potato recipe: हॉटेलसारखी रेसिपी एकदा करून पहा

कृती:

- एक पॅन घ्या त्यात सर्व मसाल्यासह हरभरा घाला आणि चांगले मिक्स करा

- बटाटा मध्यभागी कापून कपच्या आकारात बनवा.

- थोडी भाजलेली जिरेपूड आणि चाट मसाला घाला. आता हे हरभरे भरून त्यात चिंचेची चटणी, पुदीना चटणी आणि दही घाला.

- चिरलेला कांदा, टोमॅटो, शेव आणि हिरवी कोथिंबीर घाला.

- सर्व बटाट्यांसाठी हीच पध्दत फॉलो करा आणि या मसालेदार आलू हंडी चाटचा स्वाद घ्या!

loading image