Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aloo Methi Bhaji Recipe

Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

Aloo Methi Bhaji Recipe : अनेकदा हिरव्या भाज्या म्हटल्या की मुलं नाकं मुरडतात, त्यांना मेथी, शोपू, पालक खायचा नसतो. अशा काही भाज्या केल्या की हमखास बटाट्याची भाजी करावी लागते, नाहीतर सरळ सॉसच, जॅमच पाकीट बाहेर निघत.

हेही वाचा: Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

मुलांना या हिरव्या पालेभाज्या खाऊ घालणं खरच एक टास्क असतो, आणि जरी या भाज्या खाल्ल्या तरी मग ते जरा उपाशीच राहतात.अस न होण्यासाठी तुम्ही मेथीच्या भाजीत बटाटा टाकून मुलांना खाऊ घालू शकतात. मुळात बटाटा आवडता असल्याने पोटात मेथीही जाईल.

हेही वाचा: Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

बटाटा मेथी

साहित्य:

३ कप बारीक चिरलेली मेथीची पाने

१ मध्यम बटाटा, (सोलून मध्यम तुकडे करा)

१ लहान कांदा, बारीक चिरून (साधारण १/२ कप)

१ लहान टोमॅटो

फोडणीसाठी:- दिड टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद

२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून

चवीपुरत मीठ

हेही वाचा: Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

कृती:

१) टोमॅटो प्युरी - टोमॅटो काचेच्या वाडग्यात ठेवून त्यात टोमॅटो बुडतील इतपत पाणी घालावे. २ मिनीटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवावे. पाणी काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी आणि गाळून घ्यावी.

२) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग हळद, आणि मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून शिजवावा. नंतर बटाट्याचे तुकडे घालावेत. मिक्स करून झाकण ठेवाव आणि बटाटा शिजू द्यावा. बटाटा कढईला चिकटू नये म्हणून मधेमध्ये ढवळावे.

३) टोमॅटो प्युरी घालून मोठ्या आचेवर परतावे. जोवर टोमॅटो प्युरी चांगली आळत नाही तोवर परतवा.

४) आता चिरलेली मेथी घालून बरोबर २-३ चिमटी मीठ घालावे. खुप जास्त मीठ घालू नका कारण मेथी शिजल्यावर आळते आणि एकदम कमी होते. मेथीसुद्धा मोठ्या आचेवर परतवा.

५) मेथीमधील पाण्याचा अंश निघून गेला कि आच कमी करून १-२ मिनीटे परतावे.

हेही वाचा: Sanjay Gandhi Death Anniversary : लेकाची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून इंदिरा गांधी खुश झाल्या

टिपा:

१) उकडलेला बटाटाही वापरू शकतो. फक्त बटाट्याच्या फोडी मेथी परतल्यावर घालाव्यात.

२) ही भाजी कुठल्याही मसाल्याशिवाय छान लागते. तरी आवडीप्रमाणे मसाल्याचा वापर करू शकतो (धणे - जिरेपूड, गरम मसाला)

३) कांद्याऐवजी लसूणही वापरू शकतो. १ टिस्पून लसूण पेस्ट वापरावी.