esakal | नो युवर डाएट: अंडे का फंडा !
sakal

बोलून बातमी शोधा

egg

वजन पटकन घटवायचे असल्यास ‘बॉइल्ड एग डाएट’ म्हणजे उकडलेल्या अंड्याचा आहार फायदेशीर ठरू शकतो. या डाएटच्या प्रवर्तकांच्या दाव्यानुसार, दोन आठवडे काटेकोरपणे हे डाएट पाळल्यास सुमारे ५ ते ७ किलोपर्यंत वजन कमी होते. 

नो युवर डाएट: अंडे का फंडा !

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

दिवाळीत खूप खाणे झाल्यामुळे वजन वाढले, ही सध्या बहुतेकांची तक्रार आहे. वजन पटकन घटवायचे असल्यास ‘बॉइल्ड एग डाएट’ म्हणजे उकडलेल्या अंड्याचा आहार फायदेशीर ठरू शकतो. या डाएटच्या प्रवर्तकांच्या दाव्यानुसार, दोन आठवडे काटेकोरपणे हे डाएट पाळल्यास सुमारे ५ ते ७ किलोपर्यंत वजन कमी होते. 

बॉइल्ड एग डाएटनुसार सकाळचा नाश्‍ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असे दिवसातून फक्त तीन वेळा खायचे असते. त्यात उकडलेल्या अंड्यांबरोबर चिकन किंवा फिश, कमी पिष्टमय घटक असलेल्या भाज्या व कमी कर्बोदके असलेली संत्री, मोसंबी अशा आंबट चवीच्या फळांचा सामावेश असतो. भाज्यांमध्ये ब्रोकोली, कॉलिफ्लाॅवर, कोबी, पालक, पालेभाज्या, टोमॅटो, कांदा, मश्रूम, लेट्युस, काकडी अशा भाज्या खाऊ शकता. दिवसातून तीन उकडलेली अंडी व वरील पदार्थांचा सामावेश करून आपण आपल्या दिवसभराच्या खाण्याचे नियोजन करू शकतो. प्रत्येक वेळी उकडलेली अंडीच खाल्ली पाहिजेत असे नाही. ऑम्लेट किंवा कांदा टोमॅटो घालून केलेली अंडाबुर्जी खाण्याची मुभा असते.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाश्त्याला दोन अंड्यांचे ऑम्लेट व एक संत्रे खाल्ले व दुपारच्या जेवणात रोस्ट चिकन व त्याबरोबर रोस्ट केलेली ब्रोकोली, कॉलिफ्लॉवर व मश्रूम्स अशा भाज्या आणि भाज्यांचे सूप घेता येईल. एका अंड्यामध्ये ७५ कॅलरीज, ५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ६ ग्रॅम प्रथिने आणि अगदी थोडे कार्बज असतात. अंड्यात शरीराच्या आरोग्यासाठी ‘ब’ आणि ‘ड’ जीवनसत्त्व, लोह, कॅल्शिअम अशी पोषणमूल्ये असतात. अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉल असल्यामुळे दिवसातून तीनपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बॉइल्ड एग डाएट करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात 
हे डाएट दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस करू नये. 
प्रोटिन्स पचायला जड असतात, त्यामुळे हे डाएट करताना अंडी व चिकनच्या जोडीने भरपूर भाज्या व फळे खाल्ली पाहिजेत. 
आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा; अन्यथा बद्धकोष्ठतेची शक्‍यता असते.
 नाश्‍त्याला अंडे खाल्ल्यास भुकेवर नियंत्रण राहते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा