माझी रेसिपी : खमण ढोकळा

अनुराधा खरे
Friday, 14 February 2020

साहित्य - ढोकळ्याचे पीठ (३ वाटी तांदूळ, १ वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तूरडाळ चक्कीवरून दळून आणणे), आले-लसूण-मिरची पेस्ट, हळद, तिखट, मीठ, साखर, थोडे दही, सोडा.

साहित्य - ढोकळ्याचे पीठ (३ वाटी तांदूळ, १ वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तूरडाळ चक्कीवरून दळून आणणे), आले-लसूण-मिरची पेस्ट, हळद, तिखट, मीठ, साखर, थोडे दही, सोडा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृती - ढोकळ्याचे पीठ रात्री कोमट पाण्याने भिजवून ठेवावे. फार घट्ट नाही, फार सैल नाही असे. सकाळी त्यात हळद, मीठ, साखर, आले-लसूण-मिरची पेस्ट घालून मिक्स करावे. ढोकळा पात्रात पाणी गरम करायला ठेवावे. आता ज्या प्लेटमध्ये ढोकळा वाफवायचा आहे, त्याला तेल लावून त्यात या बॅटरमध्ये एक लहान चमचा सोडा (इनो) टाकून फेटून प्लेटमध्ये टाका. २० मिनिटे स्टीम करा. बाहेर काढून त्यावर तेलाची फोडणी टाका. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले थोडे फ्रेश खोबरे टाकून सर्व्ह करा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article anuradha khare on my recipe