Video : फिटनेस कॉर्नर : लॉकडाउन स्पेशल हेल्दी रेसिपी

Shruti-Jahagirdar
Shruti-Jahagirdar

भारतातील लॉकडाउन नुकताच आणखी दोन आठवड्यांनी नुकताच आला. प्रत्येकासाठीच नोकरीचे नियोजन, मुलांची काळजी घेणे व घर स्वच्छ ठेवण्यासाठी हा कठीण काळ आहे. त्यामुळेच मी तुमच्यासाठी झटपट बनविता येतील, अशा हेल्दी रेसिपीचा विचार केला. तुम्ही मित्र-नातेवाईकांनाही ती आनंदाने शेअर करू शकता. मी या रेसिपीचे आरोग्यदायी फायदेही दिले आहेत. त्यामुळे, तिला ‘हेल्दी रेसिपी’ का म्हणतात, हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा एन्जॉय करा.

फ्लेक्ससीड चीज बर्स्ट  लागणारा वेळ : २० मिनिटे

1) बॉल तयार करण्यासाठी..
पनीर : १०० ग्रॅम (बारीक केलेले) (ऑप्शनल)
जवसाचे पीठ : तीन ते चार चमचे
इसबगोल : दोन ते तीन चमचे (ऑप्शनल)
बारीक कापलेले आले : तीन चमचे 
किसलेला कांदा : तीन चमचे
चिरलेल्या मिरच्या : दोन चमचे
कोथिंबिरीची पाने : चार चमचे
चीज ५० ग्रॅम (कोणत्याही प्रकारचे. मध्यभागी भरण्यासाठी)
ऑलिव्ह किंवा खोबरले तेल

2) चटणी बनविण्यासाठी
पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण, मिरची, लिंबाचा रस आणि मिठाचे ब्लेंडरच्या मदतीने मिश्रण करून घ्यावे. तुमच्या आवडीप्रमाणे चव तयार करा. 

कृती -
एका बाऊलमध्ये सर्व घटकांचे व्यवस्थित मिश्रण करून घ्या.
यात थोडे कोमट पाणी टाकून कणीक तिंबून घ्या.
तिचे सारखे आठ भाग करा. 
आता हा प्रत्येक भाग घेऊन तुमच्या हाताच्या मदतीने ते चपटे, गोलाकार बनवा.
मध्यभागी चीजचे दोन छोटे तुकडे ठेवा. त्यानंतर त्यांना बॉलसारखा गोलाकार द्या.
कढईमध्ये पुरसे ऑलिव्ह तेल टाकून हे चीज भरलेले बॉल तळा. (पॅनचा वापर करू नका)
कढईतील तेल पुरेसे तापल्यानंतर त्यामध्ये वरील मिश्रणाचे बॉल सोडावेत. त्यानंतर, त्यांना रंग येईपर्यंत व्यवस्थित तळावे. 
गरमागरम हेल्दी बॉल चटणीबरोबर खायला द्यावेत. 

पोषक घटक (दिलेल्या प्रमाणानुसार)
कर्बोदके - २५ ग्रॅम
प्रथिने - उच्च दर्जाची ३२ ग्रॅम
फॅट्‌स - १२० ग्रॅम

फायदे - या रेसिपीत वापरलेले जवस ‘ओमेगा ३’ फॅटी ॲसिडस पुरवते. ते दाह किंवा जळजळ शमविते. चयापचय वाढविण्यासह इतरही अनेक फायदे आहेत. इसबगोल फायबर पुरवते. ते आतड्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. 

(लेखिका राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू, प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट आहेत. त्या HaloMiFitness या स्टार्टअपच्या संस्थापक सीईओ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com