Video : हेल्दी रेसिपी : कलिंगडाची भाजी आणि सांडगे

Watermelon
Watermelon

‘ग्रीष्म पातला, सूर्य तापला.. ऊन कडक जिकडेतिकडे...’ इंटरनेटवर बडबडगीतातील या ओळी वाचनात आल्या. ग्रीष्म ऋतू अर्थात उन्हाळा. या ओळी थेट लहानपणीच्या उन्हाळ्यातील आठवणींमध्ये घेऊन गेल्या. कडक उन्हाळा, सुट्टी, प्रवास, धम्माल, खेळ आणि उन्हाळ्यातील खादाडगिरी. या ऋतूमध्ये येणारी विविध फळे, रानमेवा, साठवणीच्या पदार्थांची तयारी, उन्हाळ्यातील विविध पेये व खाद्यपदार्थ उन्हाळा सुसह्य करण्यास मदत करतात. थंड, मधुर चवीचे कलिंगड हा अगदी थोरामोठ्यांचा उन्हाळ्यातील हमखास बेत. आठवतेय का, लहानपणी कलिंगडाचे बी थुंकणे हे मोठे कंटाळवाणे काम. आणि चुकून बी गिळलीच तर ‘पोटात झाड उगवण्याची’ भीती!

आहारशास्त्र व आयुर्वेदानुसार कालिंद म्हणजेच कलिंगडाचे गर, बी व साल हे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. कलिंगड तृष्णाशामक, उत्साहवर्धक, शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक व पित्तनाशक आहे. उन्हाळ्यातील त्रासंबरोबरच डोकेदुखी, मलावरोध, मुतखडा अशा आजरांमध्येही कलिंगड गुणकारी आहे. बियांचा वापर भाज्या, मिठाई, सलाड, मुखशुद्धी यांमध्ये होतो, तर सालींपासून कोशिंबीर, भाजी, थालीपीठ असे विविध पदार्थ करता येतात. शिवाय साल चेहऱ्यावर फिरवल्याने उन्हामुळे आलेला काळवंडलेपणा दूर होऊन चेहरा तजेलदार बनतो.

कलिंगडाच्या गरांची भाजी
साहित्य - कलिंगडाच्या पांढऱ्या गराच्या फोडी, मीठ, हळद, चिमुटभर साखर.
फोडणी - तेल, जीरे-मोहरी, बारीक चिरलेला कांदा, मिरची किंवा लाल तिखट, कडीपत्ता.
कृती - फोडणी करून गराचे तुकडे मीठ व साखर घालून परतणे व वाफेवर शिजवणे.
टीप - ही भाजी विविध पद्धतीने विविधप्रकाराचे वाटण किंवा मसाले वापरूनदेखील करता येईल.

सांडगे
साहित्य - पांढऱ्या गराच्या फोडी, आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, हिंग
कृती - सर्व साहित्य एकत्रित करून फोडींना व्यवस्थित लावून घेणे व कडक उन्हात दोनचार दिवस वाळवणे. वाळल्यावर तळून खाणे.
टीप - हे सांडगे २-३ वर्षे टिकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com