माझी रेसिपी : टोमॅटो पास्ता

सरला जठार, पुणे
Saturday, 14 March 2020

साहित्य - एक वाटी पास्ता, पाव वाटी कांद्याची प्युरी, पाव वाटी टोमॅटोची प्युरी, थोडे मीठ, थोडे तिखट, एक चीजचा क्यूब, थोडे बटर, दोन चमचे टोमॅटो सॉस.

साहित्य - एक वाटी पास्ता, पाव वाटी कांद्याची प्युरी, पाव वाटी टोमॅटोची प्युरी, थोडे मीठ, थोडे तिखट, एक चीजचा क्यूब, थोडे बटर, दोन चमचे टोमॅटो सॉस.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कृती - प्रथम पास्ता उकडून घ्यावा. जास्त उकडू नये. पाण्यात घालून थंड करावा. एका कढईत बटर टाकून गॅसवर ठेवावे. गॅस मंद असावा. कांद्याची प्युरी घालून गुलाबी रंगावर परतावी. त्यात टोमॅटो प्युरी घालून परतावे. थोडे पाणी घालावे. टोमॅटो शिजला पाहिजे. त्यात टोमॅटो सॉस घालावा. थोडे तिखट व मीठ घालावे. त्यात पास्ता घालून हलक्या हाताने एकत्रित करावे. गॅस बंद करावा. वरून चीज किसून घालावे. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी हलक्या जेवणासाठी उपयोगी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article my recipe tomato pasta