
एक वाटी दही (फार आंबट नसावे), १ वाटी पिठीसाखर, चिमूटभर मीठ, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, २ वाट्या मैदा, अर्धी वाटी मिल्क पावडर, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप दूध.
पुणे साहित्य - एक वाटी दही (फार आंबट नसावे), १ वाटी पिठीसाखर, चिमूटभर मीठ, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, २ वाट्या मैदा, अर्धी वाटी मिल्क पावडर, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप दूध.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कृती - प्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये दही आणि पिठीसाखर एकत्र करा, त्यात चिमूटभर मीठ आणि व्हॅनिला इसेन्स घालून छान फेटून घ्या. आता त्यात चाळलेला मैदा आणि मिल्क पावडर तसेच बेकिंग पावडर आणि सोडा घालून सर्व एकत्र करा. थोडे-थोडे दूध मिक्स करून परत थोडे फेटून झाल्यावर केकच्या टिनला ग्रीज करून त्यात हे मिश्रण ओता. प्री हिट कढईमध्ये आधी ५ मिनिटे मध्यम आचेवर व नंतर मंद आचेवर २० ते २५ मिनिटे ठेवा. किंवा प्री-हिट ओव्हनमध्ये ३० मिनिटे ठेवा. झाला टी-टाइम केक तयार.
Edited By - Prashant Patil