
गोष्ट ऐकणे आपल्या सर्वांनाच आवडते. हो ना? पण कधी एखाद्या पदार्थाला त्याचे नाव कसे मिळाले याची गंमतशीर गोष्ट ऐकली आहे का? आपले पारंपरिक पदार्थ पौष्टिक आहेत, तसेच त्यांना जोडलेल्या परंपरा, गोष्टी, गाणीदेखील रुचकर आहेत. आपल्या पूर्वजांनी त्या-त्या अन्नपदार्थांचे महत्त्व, ऋतुमानानुसार आहार, पीकपाणी या गोष्टी खूप कल्पकतेने जोडल्या आहेत. ‘धिरडं’ तसा सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात सर्वत्र बनणारा एक सोपा व पौष्टिक पदार्थ. प्रत्येक प्रांतात वेगवेगळे जिन्नस वापरून तो बनवला जातो. काही ठिकाणी धिरडे नाष्ट्यामध्ये खातात तर काही ठिकाणी जेवणामध्ये.
गोष्ट ऐकणे आपल्या सर्वांनाच आवडते. हो ना? पण कधी एखाद्या पदार्थाला त्याचे नाव कसे मिळाले याची गंमतशीर गोष्ट ऐकली आहे का? आपले पारंपरिक पदार्थ पौष्टिक आहेत, तसेच त्यांना जोडलेल्या परंपरा, गोष्टी, गाणीदेखील रुचकर आहेत. आपल्या पूर्वजांनी त्या-त्या अन्नपदार्थांचे महत्त्व, ऋतुमानानुसार आहार, पीकपाणी या गोष्टी खूप कल्पकतेने जोडल्या आहेत. ‘धिरडं’ तसा सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात सर्वत्र बनणारा एक सोपा व पौष्टिक पदार्थ. प्रत्येक प्रांतात वेगवेगळे जिन्नस वापरून तो बनवला जातो. काही ठिकाणी धिरडे नाष्ट्यामध्ये खातात तर काही ठिकाणी जेवणामध्ये. काही ठिकाणी धिरड्याला ‘सणावाराचा पदार्थ’ असे खास स्थानदेखील मिळाले आहे. या विविध रंगांच्या, विविध प्रकारच्या भूमिका वठवणाऱ्या धिरड्याची गोष्ट भारी गमतीशीर आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एकदा एक माणूस दुसऱ्या गावी त्याच्या मित्राकडे जातो. तिथे तो मित्राच्या घरी जेवणात धिरडे आणि आमरस खातो. या माणसाला धिरडे खूप आवडते. तो ठरवतो, घरी जाऊन मी बायकोला धिरडे करायला सांगेन. घरी परतेपर्यंत तो पदार्थाचे नाव विसरून जातो. बायकोला तो सगळं वर्णन वगैरे सांगतो, पण त्याच्या बायकोला काही बोध होत नाही. म्हणून मग तो तिला मारायला सुरुवात करतो. ती ओरडायला लागते. ‘अहो, तुम्हाला नाव आठवत नाही तर त्यासाठी माझी पाठ का म्हणून धिरडून काढता?’ तो आनंदाने ओरडतो, ‘अगं, हेच तर खायचं होतं मला. ‘धिरडं’च तर म्हणतात त्याला.’
धिरडे काढणे - खरपूस मार देणे.
(आता ‘धिरडं’ सर्वांच्या लक्षात राहील याची खात्री आहे मला.)
साहित्य - मूगडाळीचे पीठ १ वाटी, कणीक पाऊण वाटी, बेसन अर्धी वाटी, मीठ, तेल.
वाटण - लसूण, मिरची, जिरे (आवडीनुसार)
कृती - वरील सर्व साहित्य डोशाच्या पिठाप्रमाणे भिजवून अर्धा तास बाजूला ठेवणे. तवा गरम करून डोशाप्रमाणे धिरडे तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी भाजून घेणे.