esakal | भारतीय पोषण खजिना : पंचरत्न भाकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Bhakari

गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण भारतीय पोषण खजिन्यातली काही ‘रत्नं’ बघितली. आता त्यापैकी काहींचा आढावा घेऊ आणि त्यांच्यातून उत्तम पाककृती कशी करता येते, ते बघू.

भारतीय पोषण खजिना : पंचरत्न भाकरी

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण भारतीय पोषण खजिन्यातली काही ‘रत्नं’ बघितली. आता त्यापैकी काहींचा आढावा घेऊ आणि त्यांच्यातून उत्तम पाककृती कशी करता येते, ते बघू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजरी

  • मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्यानं आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब योग्य राखण्यासाठी उत्तम.
  • तंतूमय पदार्थ जास्त असल्यानं पचनासाठी उत्तम.

ज्वारी 

  • तंतूमय पदार्थ भरपूर. ग्लुटेनमुक्त असल्यानं मधुमेहींसाठी योग्य. 
  • मॅग्नेशियम आणि आयर्न भरपूर असते आणि रक्तदाब व कोलेस्टेरॉल कमी करते.

नाचणी

  • यातले घटक हाडं मजबूत बनण्यासाठी उपयुक्त ठरतात. नाचणीत कॅल्शियमचाही उत्तम असल्यानं वाढत्या वयाच्या मुलांच्या आहारात तिचा समावेश केला जातो. 
  • नाचणी नैसर्गिक आयर्नचा उत्तम स्रोत असतो आणि ती कुपोषणासाठी लढण्यासाठी मदत करते.

राजगिरा

  • राजगिऱ्यामध्ये प्रोटिन्स भरपूर असतात; तसंच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम आदी घटकही उत्तम प्रमाणात असतात. 
  • केवळ उपासाच्या काळात राजगिऱ्याचं सेवन न करता नियमित आहारातही त्याचा समावेश केला पाहिजे. 

बेसन

  • प्रोटिनचा उत्तम स्रोत.
  • मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती घटकांपैकी एक.

रेसिपी : पंचरत्न भाकरी
घटक -
एक टेबलस्पून बाजरी, एक टेबलस्पून ज्वारी, एक टेबलस्पून नाचणीचं पीठ, अर्धा टेबलस्पून राजगिरा पीठ, बेसन
हे सगळे घटक एकत्र आल्यानं ते भाकरी अतिशय पोषक बनवतात आणि विशेषतः वाढत्या वयातली मुलं, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ती अतिशय उपयुक्त असते. 

कृती - हे सगळे घटक पाण्यात भिजवून भाकरीचं पीठ तयार करा. बाकी नेहमीच्या पद्धतीनं भाकरी बनवून तिच्यावर तीळ पण घाला. ही भाकरी गरमागरम खायला छान लागते.

Edited By - Prashant Patil

loading image