Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या उपवासाला केळी शेक प्या, दिवसभर फ्रेश रहा!

सर्व व्रतांपैकी आषाढी एकादशीचे व्रत अनन्यसाधारण आहे
Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023 esakal

Ashsadhi Ekadashi 2023 : एकादशी साधारणत: वर्षाच्या प्रत्येक महिन्यात येते परंतु आषाढीचा अकरावा दिवस एक महान एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करीत अनेक वारकरी पंढरपुरात पोहोचतात.

हा सोहळा अतिशय लक्षवेधी असतो. सर्व व्रतांपैकी आषाढी एकादशीचे व्रत अनन्यसाधारण आहे. वर्षभरात सुमारे 14 एकादशी असतात. पण त्यातही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते.

यंदा पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी 29 जून 2023 रोजी पहाटे 03.18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 जून 2023 रोजी पहाटे 02.42 वाजता समाप्त होईल.या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात.

Ashadhi Ekadashi 2023
Banana Crop Insurance : केळीच्या नुकसानीपोटी मिळणार प्रतिहेक्टर 'इतक्या' रुपयांचा लाभ

तुम्हीही यंदा एकादशीचा उपवास करणार असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. कारण उन्हाळ्यातील उपवासासाठी हि रेसिपी फायदेशीर ठरणारी आहे. उपवासादिवशी अनेकांना खिचडी, भगर खाऊन पित्ताचा त्रास होतो. अशावेळी पोटाला थंडावा देईल असा केळीचा शेक कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत.

उपवासात दिवसभर एनर्जी टिकून रहावी, लवकर भूक लागू नये म्हणजे फराळाचे विविध पदार्थ केले जातात. केळी हे असे फळ आहे की उपवासाच्या वेळी ते खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ राहू शकता. हे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही.

Ashadhi Ekadashi 2023
Banana Peel Benefits : केळीच्या सालीचे आश्चर्यचकीत करणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

जर तुम्हाला उपवासात दिवसाची सुरुवात केळीने करायची असेल तर तुम्ही केळी शेक पिऊ शकता. हे प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया झटपट केळीचे ड्रिंक कसे तयार करता येईल.

केळी शेक साहित्य:

3 केळी
3 कप थंड दूध
2.5 चमचे साखर
2 कप बारीक चिरलेले बदाम आणि काजू

Ashadhi Ekadashi 2023
Banana Tree : ज्योतिषशास्त्रात केळीच्या झाडाला एवढे का महत्त्व आहे?

केळी शेक कसा बनवायचा

- 3 केळी घ्या, त्यांची साल काढा, त्यांचे लहान तुकडे करा आणि एका भांड्यात ठेवा.
- आता केळीचे तुकडे, साखर, दूध घालून मिक्सरमध्ये टाका.
- आता बदाम आणि काजू घाला आणि बारीक करा
- आता तुमचा थंडगार केळ्याचा शेक तयार आहे.
- ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा.

- यामध्ये तुम्ही वेलचीपुड देखील घालू शकता. चवही छान देत आणि या शेकमुळे काही त्रासही होत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com