Banana Peel Benefits : केळीच्या सालीचे आश्चर्यचकीत करणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

केळीच्या सालीचे सात उत्तम फायदे कोणते?
Banana Peel Benefits
Banana Peel Benefitsesakal

Banana Peel Benefits : केळी खाल्ल्यानंतर बहुतेक लोक साले फेकून देतात, परंतु या सालींमध्ये भरपूर पोषक असतात. त्यांचे सेवन केल्यास अनेक आजार टाळता येतात. केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहीत आहेच. नाष्टयामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची सालदेखील खूपच फायदेशीर आहे, हे कमी लोकांना माहीत असतील.

सर्वांनाच केळी खायला आवडते. केळी अतिशय मऊ आणि चवदार असते. हे फळ पोषक तत्वांनी देखील भरपूर आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. केळीच्या फायद्यांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण तुम्हाला माहित आहे का की केळ्याची साल देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. केळी खाताना बहुतेक लोक साले फेकून देतात.

पण या सालीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. केळीच्या साली खाण्याचे पर्यावरणीय फायदेही आहेत. साले खाऊन तुम्ही लँडफिलमध्ये जाणारे अन्न कमी करण्यास मदत करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला केळीच्‍या सालींमध्‍ये असलेले पोषक आणि फायद्यांविषयी सांगत आहोत.

Banana Peel Benefits
Banana Benefits : पुरुषांनी केळी का खावी?

वेबएमडीच्या अहवालानुसार, केळी आणि त्यांची साले दोन्ही आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे देऊ शकतात. हिरवी केळी पाचन समस्यांवर उपचार करण्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकते, तर पिकलेली केळी शरीराला संसर्गापासून लढण्यास मदत करते.

केळीच्या सालीपासून हेल्दी स्नॅक्स आणि मिठाई बनवता येते. केळीचा आतील भाग मऊ आणि गोड असतो, तर केळीची साल कडक आणि कडू असते. तुमची केळी जितकी जास्त पिकलेली असेल तितकी त्याची साल गोड आणि मऊ असेल.

केळीवर अनेक प्रकारच्या रसायनांची फवारणी केली जाते, त्यामुळे ते खाण्यापूर्वी साल नीट धुवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. केळीची साले नीट धुऊनच खावीत, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

Banana Peel Benefits
National Banana Day : पुरुषांनो, केळी खा अन् लैंगिक समस्या सोडवा

केळीच्या सालीचे सात उत्तम फायदे

त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करू शकता. सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्यादेखील कमी होऊ लागतात. केळीच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते.

केळीच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील. केळीची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात.

केळीची साले कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, साखर, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि लोह यासह पोषक तत्वांचे भांडार आहेत. याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि त्यांची कमतरता भासत नाही. शरीर मजबूत होण्यासाठी पोषक तत्वे आवश्यक असतात.

Banana Peel Benefits
Banana Peel For Skin : तुम्ही फेकत असलेलं केळीचं सालही आहे फायद्याचं; चेहरा करेल झटक्यात चमकदार

केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे मूड डिसऑर्डर आणि नैराश्यापासून खूप आराम देते. ट्रिप्टोफॅनचे शरीरात सेरोटोनिनमध्ये रूपांतर होते, जे तुमचा मूड सुधारू शकते. सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन बी 6 झोप सुधारते, ज्यामुळे मूड सुधारतो.

केळीच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता आणि जुलाबाच्या रुग्णांनी केळीची साल खावी. क्रॉन्स डिसीज आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या रुग्णांसाठी केळीची साल अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

Banana Peel Benefits
Bananas for Hair Growth: लांब केस हवेत? मग केळीच्या सालीचा असा वापर करून पाहा

डोळे निरोगी ठेवण्यासाठी केळीच्या सालींचे सेवन करावे. केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए तुमचे डोळे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. केळी आणि केळीच्या सालीमध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते.

केळीच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या शरीरात कॅन्सर निर्माण करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात. कच्च्या केळ्याची साल खाल्ल्याने तुमची अँटिऑक्सिडेंट पातळी वाढू शकते आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com