Ashadhi Ekadashi 2023 : उपवासाच्या दिवशी तेच तेच खाऊन कंटाळा आलाय, करा मग हे खमंग पदार्थ

उपास असला तरी काही जणांना भुक सहन होत नाही. आणि ज्यांना पाककृतींचे नवनवीन प्रयोग करून पाहायला आवडतात त्यांच्या साठी खास उपवासाचे पदार्थ
ekadashi food
ekadashi foodSakal

आषाढी एकादशी हा पांडुरंगाचा उत्सव महाराष्ट्रात खूप महत्वाचा मानला जातो . ही एक एकादशी धरली तर बारा महिन्याच्या एकादशीच फळ मिळत असं म्हटलं जातं . या महिन्यात वारकरी वारीला जातात तर ज्यांना शक्य नाही असे भक्त घरीच देवाची पूजा करून मन शांत करतात .

उपास असला तरी काही जणांना भूक सहन होत नाही. आणि ज्यांना पाककृतींचे नवनवीन प्रयोग करून पाहायला आवडतात त्यांच्या साठी खास उपवासाचे पदार्थ .. तुम्ही करून पाहू शकता .

आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाला स्पेशल काय फराळ करावा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर या वेळी तुम्ही टेस्टी उपवासाची भेळ करू शकता.

ही भेळ खायला जितकी टेस्टी आहे तितकीच हेल्दी सुद्धा आहे. जाणून घ्या उपवासाची भेळ कशी बनवायची?

ekadashi food
ekadashi foodSakal

साहित्य

  • साबुदाणाची खिचडी

  • बारीक चिरेलेली काकडी

  • खारे शेंगदाणे

  • तळलेला बटाट्याचा किस

  • दही

  • साखर

  • तळलेला नायलॉनचा साबुदाणा

ekadashi food
Ashadi Ekadashi 2023 : अनुभवाची वारी...चुकू न दे हरी...हेचि मागणे तुझ्या दारी.. पांडुरंगा!

कृती

  • साबुदाण्याची खिचडी बनवावी.

  • त्यात तळलेला साबुदाणा, खारे शेंगदाणे, तळलेला बटाटा किस, चवीनुसार साखर आणि दही टाकावे.

  • या मिश्रणाच बारीक चिरलेली काकडी टाकावी

  • सर्व एकत्र मिक्स करावे.

  • उपवासाची भेळ तयार झाली.

ekadashi food
ekadashi foodSakal

रताळ्याची खीर

रताळ्याची खीर बनवण्यासाठी 3-4 मध्यम आकाराचे रताळे, अर्धा लिटर दूध, अर्धा कप साखर, आणि एक चमचा ड्राय फ्रुट, अर्धा चमचा वेलची पावडर घ्या. 
यासाठी आधी रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. रताळी छान सोलून घेणे. ते काढून मग किसून घ्यावीत.

एका कढईत एक चमचा तूप घालून ते गरम करावे. त्यात रताळ्याचा किस टाकून दोन-तीन मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात दूध टाकून शिजून द्यावे. यात घातलेले दूध अर्ध होऊ द्यावे. मग त्यात साखर, बदामाचे काप, वेलची पावडर घालावी. खीर ढवळून घ्यावी मग गॅस बंद करा आणि खीर थंड होऊ द्या. खीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही खीरीचा आनंद घेऊ शकता.

ekadashi food
Ashadi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घ्या 'या' खास पदार्थांचा आस्वाद..
Sakal

रताळ्याचा पराठा

रताळ्यापासून बनवलेला पराठा हा शरीराला ऊर्जा देणारा असतो.  रताळ्याचा पराठा करण्यासाठी अर्धा किलो रताळे, 200 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिर्या पीठ, साजूक तुप आणि वेलची पावडर घ्या.

पराठे बनवताना रताळी उकळून घ्यावीत. मग ती सोलुन कुस्करुन घ्यावीत. कढईत थोडं तूप घालून मंद आचेवर कुस्करलेरी रताळी परतावीत. परताना खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर त्यात टाकून मिश्रण थंड होऊ द्यावे.

तोपर्यंत पराठ्यांसाठी लागणारे पीठ मळून घ्यावे. त्यासाठी शिंगाड्या आणि राजगिऱ्याची पीठ एकत्र करुन पाण्याने मळून घ्यावे. आणि ते एका छोट्या लाटीच्या छोट्या पोळीत भरावे. बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे रताळ्याचा हा पराठा शेकून घ्यावा. शेकताना पराठ्यावर तेल किंवा तूप सोडा. पण पराठे तुपावर शेकल्याने ते आरोग्यदायी होतात आणि खमंगही लागतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com