
Ekadashi 2025 Food: आषाढी एकादशी हा विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीने भरलेला आणि उपवासाचा पवित्र सण, यंदा 6 जुलै 2025 रोजी एकादशी साजरी केली जाणार आहे. या शुभदिनी उपवास करताना सात्त्विक आणि चविष्ट पदार्थ बनवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. अशावेळी तुम्ही एक झटपट आणि पौष्टिक राजगिरा खीर १५ मिनिटांत तयार करु शकता. ही खीर केवळ चवदारच नाही, तर पचायला हलकी आणि पौष्टिक आहे. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तात, विठ्ठल भक्तीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही खीर नक्कीच खास ठरेल. चला, नोट करा ही सोपी रेसिपी आणि उपवासात घ्या गोड आणि सात्त्विक आनंदाचा अनुभव. राजगिरा खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.