
What to eat on Ekadashi instead of sabudana: १८ जून रोजी पंढरपूरला रवाना झालेली वारी ६ तारखेला म्हणजेच आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपुरला पोचणार. आजचा दिवस भक्ती, श्रद्धा आणि सात्त्विकतेचा संगम याने पूर्ण असतो. आज अनेक जण उपवास करतात. विठुरायाच्या भक्तीत रंगून गेलेल्या भक्तांसाठी उपवासाचे देखील खास महत्त्व असते.
अशा वेळी उपवास करताना नेहमीच साबुदाणा खिचडी, वरीचा भात किंवा साबुदाणा वडा यासारखे पारंपरिक पदार्थ खाल्ल्याने कंटाळा येऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दोन वेगळ्या आणि स्वादिष्ट रेसिपीज सांगणार आहोत — पौष्टिक राजगिऱ्याची खीर आणि कुरकुरीत मेदू वडे! चला तर मग रेसिपी जाणून घेऊया.
उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड आणि पचनास हलके खायची इच्छा असल्यास राजगिऱ्याची खीर हा उत्तम पर्याय ठरतो. ही खीर बनवायला सोपी असून यासाठी लागणारे साहित्यही अगदी कमी आणि सहज उपलब्ध आहे.
राजगिरा – ½ कप
दूध – 2 कप
साखर – ¼ कप (चवीनुसार)
वेलची पूड – ½ चमचा
तूप – 1 चमचा
केशर – काही धागे
ड्रायफ्रूट – बदाम, काजू, पिस्ते (ऐच्छिक)
प्रथम, कुकरमध्ये तूप गरम करून त्यात स्वच्छ धुतलेला राजगिरा मंद आचेवर हलक्या हाताने भाजून घ्या.
भाजलेला राजगिरा शिजवण्यासाठी त्यात 1–2 ग्लास पाणी घालून 3–4 शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये शिजवा.
दुसऱ्या भांड्यात दूध उकळून घ्या.
शिजलेला राजगिरा थंड झाल्यावर त्यात उकळलेले दूध टाका.
त्यात साखर, वेलची पूड, केशर आणि ड्रायफ्रूट घालून खीर ५-७ मिनिटं उकळा.
सर्व्ह करताना गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे ही खीर देता येते.
नेहमी उडदाच्या डाळीपासून बनवला जाणारा मेदू वडा उपवासात खाण्यास नसेल, पण आज आपण वरी आणि साबुदाणा वापरून उपवासासाठी योग्य असा खास वर्जन पाहणार आहोत.
वरी – 1 कप
साबुदाणा – 2 मोठे चमचे
उकडलेले बटाटे – 1
शेंगदाणा पेस्ट – 4 चमचे
दही – 3 चमचे
आलं, मिरची पेस्ट – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
पाणी – 2 कप
तळण्यासाठी तेल
वरी आणि साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून पिठासारखा बारीक करा.
एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ, आलं घालून उकळा. नंतर त्यात तयार मिश्रण टाकून ५-६ मिनिटं शिजवा.
एका प्लेटमध्ये उकडलेला बटाटा किसून घ्या. त्यात दही, मिरची पेस्ट, शेंगदाणा पेस्ट आणि वरील पीठ मिक्स करून गोळा बनवा.
हाताला तेल लावून छोटे वडे बनवा आणि मध्ये भोक करा.
गरम तेलात मंद आचेवर तळा. कुरकुरीत मेदू वडे तयार!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.