

Delicious Whole Wheat Cauliflower Paratha Recipe for a Cozy Winter Breakfast
esakal
Punjabi Gobi Paratha Recipe: हिवाळा सुरू झाला की घरात नवनवीन आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याची लगबग पाहायला मिळते. थंडीच्या या दिवसात बाजारात ताजे आणि सुंदर पांढरे शुभ्र फुलकोबी (Cauliflower) उपलब्ध असतात. फुलकोबीपासून अनेक प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात, पण हॉटेलसारखा किंवा पंजाबी स्टाईल खमंग आणि कुरकुरीत 'गोबी पराठा' (Gobi Paratha) खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. अनेकदा गृहिणींची तक्रार असते की गोबीचा पराठा लाटताना फुटतो किंवा त्यात पाणी सुटल्यामुळे तो चिकट होतो.
पण, योग्य टिप्स आणि अचूक पद्धतीने बनवल्यास हा पराठा अतिशय मऊ, टम्म फुगलेला आणि खमंग तयार होतो. घरातील सर्व सदस्यांना आवडेल अशी ही प्रसिद्ध रेसिपी कशी बनवायची, याची सविस्तर माहिती आणि सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत-