आहार‘मूल्य’ : हिवाळ्यासाठीचा आहार

पहाटेच्या वेळेस आता गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. हवेतल्या बदलांमुळे आपल्या शरीरात खालील बदल जाणवू लागतात.
food
foodsakal
Updated on

अवंती दामले,

आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

पहाटेच्या वेळेस आता गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. हवेतल्या बदलांमुळे आपल्या शरीरात खालील बदल जाणवू लागतात.

१) त्वचा कोरडी पडते

२) रोगप्रतिबंधक शक्ती कमी होते

३) ॲलर्जी

४) केसगळती

५) बॉडीपेन (वेदना)

६) स्नायूंचा कडकपणा

वरील शारीरिक बदलांना सामोरे जाण्यासाठी

दैनंदिन आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे. आहारात बदल करताना

१. हिवाळ्यामध्ये पचनशक्ती सुधारते आणि अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणून आहारात विविध प्रकारच्या तेलबिया, जवस, तीळ, कारळी, सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया यांचा समावेश करावा. त्यांच्यातून नैसर्गिक तेल, ओमेगा ३, फॅट्स मिळायला मदत होते. झिंक, सेलेनियम, कॅल्शियम इत्यादीसारखे क्षार मिळण्यास मदत होते.

२.प्रथिनं : आहारामध्ये डाळी, उसळी, पनीर, टोफू, अंड्यातले पांढरे, मासे इत्यादींचा समावेश करावा. प्रथिनांमुळे स्नायूंची ताकद वाढते आणि रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी मदत होते.

३.जीवनसत्त्वयुक्त फळं : हिवाळ्यामध्ये संत्री, मोसंबी, आवळे, लिंबू इत्यादीसारखी फळं मिळतात. त्यांच्याद्वारे जीवनसत्त्व क मिळण्यास मदत होते, कोलॅजेन निर्मितीसाठी मदत होते. लोहाचं शोषण होण्यास मदत होते.

४.हिवाळ्यामध्ये गाजर, पापड इत्यादींसारख्या फळं आणि भाज्या मिळतात, त्यांचं सेवन करावं, त्याच्यापासून जीवनसत्त्व अ मिळण्यास मदत होते. त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

५.पाणी : दिवसभरात किमान १२-१५ ग्लास पाणी प्यावं. थंडीमुळे तहान लागत नाही आणि डिहायड्रेशन होतं.

६.हळद, दालचिनी, लवंग, मिरी या मसाल्यांचा समावेश आहारात करावा. रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यास मदत होते.

७.आहारात शीतपेयं, थंड पदार्थाचा वापर टाळावा आणि ताजे व गरम पदार्थ खाण्यात असावेत.

८.मटार, हुरडा इत्यादीसारखे पदार्थ हिवाळ्यात मिळतात. त्यांच्यापासून प्रथिने, क्षार मिळतात. त्यांचा वापर आहारात करावा.

हिवाळ्यासाठीचा आहार तक्ता

सकाळी उठल्यावर :

१ चमचा च्यवनप्राश घ्यावे

१ कप हळद दूध

१ तास व्यायाम

नाश्ता : कडधान्याचे डोसे/धिरडी/अप्पे/

अंड्यांचे पदार्थ

११ वाजता : फळ

दुपारचे जेवण : भाज्या, सॅलड, ताक (सुंठ घालून), भाकरी, भात, वरण

४ वाजता : सुका मेवा, भोपळा बी (१ चमचा)

६ वाजता : भाज्यांचे सूप

रात्रीचे जेवण : कढी-खिचडी/ पालेभाजी,

भाकरी, पिठले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.