
Bhagar Food Safety
Esakal
थोडक्यात:
सकाळी बनवलेली भगर दिवसभर खोलीत ठेवल्यास त्यात जंतू वाढतात आणि रात्री खाल्ल्यास अन्नविषबाधेचा धोका वाढतो.
उपवासाच्या अन्नाची स्वच्छता आणि योग्य साठवणूक गरजेची आहे, अन्न प्रशासनाने पॅकबंद उत्पादन वापरण्याचा सल्ला दिला आहे.
अर्धवट शिजवलेले किंवा शिळं अन्न, तसेच उघड्यावर विकली जाणारी भगर किंवा पीठ खाणं टाळा.
Bhagar Food Safety: नवरात्रोत्सवात अनेकजण उपवास करतात. यावेळी भगर, साबुदाणा फळं अशा उपवासाच्या पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र या काळात अनेक वेळा अन्नातून विषबाधेचे प्रमाणही वाढते. त्यामुळे सकाळी बनवलेली भगर रात्री खाणं टाळावे असा सल्ला अन्न प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.