
सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' चूका टाळा, होऊ शकतात आरोग्याच्या समस्या
Morning Breakfast Mistakes: सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे, त्यासाठी त्यामध्ये भरपूर पोषक तत्व असले पाहिजे. जेणेकरून शरीरामध्ये दिवसभर एनर्जी राहू शकते. न्यूट्रिशियस डाइट न घेतल्यास शरीराचा योग्य प्रकारे विकास होऊ शकत नाही. त्याशिवाय चूकीच्या डाएट लठ्ठपणा कमी करण्यासाठी अडथळा ठरू शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारे आजार होण्याची शक्यता असते. जसे की, हार्ट अॅटक, हार्ट ब्लड प्रेशर, डायबिटीज वैगेरे. आपल्या नाश्त्यामध्ये आपण कोणकोणत्या चूका करतो ज्यामुळे आपल्या आरोग्याचे नूकसान होऊ शकते.
हेही वाचा: जिथं महिला बॉस तिथं प्रगती, पुरुषांची छाप पडली कमी
नाश्त्यामध्ये कॅफिनचे सेवन
बहूतेक लोक सकाळी सुरूवात चहा किंवा कॉफीपेक्षा करतात. त्यावेळी तुम्हाला चांगले वाटत असेल पण आरोग्यासाठी हे आजिबात योग्य नाही. चहा किंवा कॉफी Tannin सारखे तत्व असते जे शरीरामध्ये कॅल्शिअम आणि आयरन योग्य प्रकारे अॅब्जॉर्ब केले जात नाही, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात.
कार्बोहायड्रेट टाळा
सकाळच्या नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन टाळा. यामुळे शरीरामध्ये एनर्जी मिळते. नाश्त्यामध्ये जेवण ब्रेड, दलिया, भाजी, पराठे असे पदार्थ समाविष्ट करू शकतो.
हेही वाचा: मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट, किती वाढू शकतो DA?
प्रथिनेयुक्त आहार न घेणे
निरोगी राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. प्रथिनेयुक्त आहार घेणे सर्वात मोठा फायदा आहे की त्यामुळे पोट दिर्घकाळासाठी भरलेले असते.ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. तसेच तुम्हाला पूर्ण दिवस उर्जा मिळते. नाश्त्यामध्ये अंडे, मूगडाळीचे धिरडे, पीनट बटर सॅन्डविच, सोयाबीन,पनीर सारख्या वस्तूंसाठी समावेश करा. त्यामध्ये दिवसभर योग्य प्रमाणात प्रथिने मिळू शकते.
ज्यूसचे सेवन
ऑफिसमध्ये जाण्याच्या घाईमध्ये नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कित्येक लोक ज्यूस पिऊन जातात. दिवसभर लोक धावपळीमध्ये पुन्हा योग्य प्रकारे जेवण करत नाही. त्यामुळे बॉडीमध्ये व्हिटॅमिन, कॅलरी, मिनरल, फायबर सारखे तत्वांमध्ये कमतरता होऊ शकते ज्यामुळे कित्येक प्रकारे आरोग्याच्या समस्यांसंबधी त्रास सुरू होऊ शकतात.
Web Title: Avoid These Morning Breakfast Mistake Can Cause Health Problems
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..