मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट, किती वाढू शकतो DA?

7th pay commission Marathi News
7th pay commission Marathi NewsTeam eSakal

7th Pay Commission Latest News Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्ससाठी (Central Government Employees)चांगली बातमी. सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्सला महागाई भत्ता (DA) मिळणार आहे. होळीपूर्वी या निर्णय जाहीर होण्याची शक्यताा आहे. या निर्णयामुळे ५० लाख पेक्षा जास्त सरकारी कर्माचऱ्यांने आणि ६५ लाखांपेक्षा जास्त पेंशनर्सने थेट फायदा होणार आहे. (Holi gift from Modi government to central employees how much can increase DA)

जाणून घ्या किती वाढू शकतो DA

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ३१ टक्क्यांचा Dearness Allowance (DA)मिळतो. ऑल इंडिया कंज्यूमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्टियल वर्कर्सचे(AICPI) डिसेंबर २०२१च्या आकडेवारी पाहता, केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA तीन टक्क्यांनी वाढवू शकतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा DA 34 टक्के होऊ शकतो.

7th pay commission Marathi News
Share Market: शेअर बाजार वधारला; सेन्सेक्समध्ये 369.9 तर निफ्टी 64.55 अंकांची वाढ

या तारखेला होऊ शकतो निर्णय

देशामध्ये ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निकालाची घोषा १० मार्चला होणार आहे. त्यासोबत निवडणूकीची आचार संहिता संपून जाईल. त्यानंतर सरकार डीएबाबत निर्णय घेऊ शकते. रिपोर्टसनुसार, १६ मार्च २०२२ला केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली पाहिजे. या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) वाढविण्याची घोषणा केली आहे.

7th pay commission Marathi News
LIC चा IPO पुढे ढकलला जाणार नाही? २२ दिवसांमध्ये ड्राफ्टला सेबीची मंजूरी

केद्रीय कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट

जर केंद्र सरकार १६ मार्च ७ वे वेतन आयोगाच्या (7th Pay commission) शिफारशीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना महगाई भत्त्यामध्ये वाढ केल्यास ती होळीच्या आधी सरकारी कर्मचारी आणि पेंशनर्ससाठी मोदी सरकार होळीसाठी गिफ्ट मिळणार आहे. यावेळी १८ मार्चपासून होळी साजरी केली जाणार आहे.

7th pay commission Marathi News
Gold Rate: सोन्याचा भाव 'रेकॉर्ड ब्रेक' करणार? उच्चांकापासून फक्त 2000 रुपये दूर

काय आहे महागाई भत्ता?

महगाई सतत वाढत आहे. अशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ आवश्यक आहे. सरकार महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना पेंशनर्सला DA देत आहे. महागाई भत्ता मुळ वेतनाच्या आधारावर दिला जातो. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी ाणि जुलैमध्ये DA आणि DR संबधी फायद्यामध्ये सुधारणा करते. शहरांच्या हिशोबाने कर्मचाऱ्यांना DAमध्ये फरक दिसू येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com