माझी रेसिपी : बाकरवडी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

बाकरवडी रेसिपी

साहित्य : सारणासाठी - १ वाटी खोबरे किसलेले, अर्धी वाटी तीळ कूट, अर्धी वाटी शेंगदाणे कूट, १ चमचा खसखस, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी चिरलेला हिरवा लसूण, १ चमचा हिरवी मिरची-लसूण ठेचा, १ चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, अर्धा चमचा हळद, ३ चमचे पिठीसाखर, १ चमचा लिंबूरस, चवीनुसार मीठ.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कणीकसाठी - २ वाट्या बेसन, १ वाटी गव्हाचे पीठ. अर्धी वाटी मैदा, २ चमचे तेल, १ चमचा मीठ, अर्धा चमचा हळद.

कृती : किसून भाजलेले खोबरे, तीळ, खसखस, साखर हे सर्व थोडे जाडसर दळून घ्यावे. थोडी कोथिंबीर तेलाशिवाय कढईमध्ये परतून घ्यावी, म्हणजे त्यात पाण्याचे कण राहणार नाहीत. मिरची व लसणाचा ठेचा, मिक्सरचे जिन्नस, तिखट, गरम मसाला, हळद, धने-जिरेपूड, मीठ, लिंबूरस सर्व एकत्र करून सारण तयार करावे. आता कणकेची एक मोठी पोळी लाटून त्यावर चिंच-गुळाचे घट्ट मिश्रण लावावे. त्यावर सारण पसरवावे. घट्ट रोल वळावा. १ इंच जाडीचे रोल कट करून हाताने थोडे दाबावे. नंतर मंद आचेवर तळून घ्यावे.

अनुराधा खरे, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bakarwadi recipe