esakal | बासमती तांदळाचा मोकळा भात करण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

basmati

बासमती तांदळाचा मोकळा भात करण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: बरेच जण बासमती तांदळाचा भात मोठ्या आवडीने खातात. अनेक जणांना या तांदळाचा भात एकदा खाल्ला की पुढील वेळेसही ते या तांदळाच्या भाताला पसंदी देतात. पण या तांदळाचा भात स्वाद न बिघडता येणे ही देखील महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा या तांदळाचा भात बनवताना चुका होता त्यामुळे हा भात गिचकूळ होतो किंवा त्याची चव बदलते. चला तर मग आज जाणून घेऊया की बासमती तांदळाचा भात बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि तो कसा करायचा.

बासमती भात

बासमती भात

पाण्याचा अंदाज-

इतर तांदळाचा भात बनवताना आणि बासमती तांदळाचा भात बनवताना वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे बासमती तांदळाचा भात बनवताना योग्य प्रमाणात पाणी वापरणे महत्त्वाचे आहे. जर व्यवस्थित मोजमाप न करता पाणी टाकले तर तो भात अधिक चिकट आणि गिचकूळ होतो. तसेच पाणी हे भात तुम्ही कशावर बनवत आहात यावरही अवलंबून असते. जर कुकरमध्ये भात बनवत असाल तर त्यासाठी पाण्याचे प्रमाण आणि जर भाड्यांत करणार असाल तर त्यासाठी पाण्याचे प्रमाण वेगळे ठेवावे लागते.

पहिल्यांदा पाण्यात भिजवा-

बासमती तांदळाचा भात अचूक पध्दतीने बनवण्यासाठी तो पहिला पाण्यात भिजवला तर योग्य बनतो. भात शिजवायला घालायच्या अगोदर पहिले 15 मिनीटे तो पाण्यात भिजवून घ्यावा. त्यानंतर तुम्ही तो भात शिजवू शकता.

लिंबू आणि खोबरेल तेलाचा वापर बासमती तांदूळ बनवताना केल्यास फायदेशीर ठरतो

लिंबू आणि खोबरेल तेलाचा वापर बासमती तांदूळ बनवताना केल्यास फायदेशीर ठरतो

लिंबू आणि नारळ तेल वापरा-

लिंबू आणि खोबरेल तेलाचा वापर बासमती तांदूळ बनवताना केल्यास फायदेशीर ठरतो. भात आणि पाणी भांड्यात घालता तेव्हा त्यात एक ते दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा नारळाचे तेल घालून शिजवा. जर भात कुकर बनवत असाल तर, नंतर हे पदार्थ घालून १ शिटी घालून गॅस बंद करा आणि कूकरमधून हवा आपोआप बाहेर येऊ द्या. त्यानंतर हा भात अधिक पांढरा, पौष्टिक आणि चवपूर्ण बनतो.

जेव्हा पाणी खूप जास्त होते-

बर्‍याचदा सर्व गोष्टींची काळजी घेतल्यावरही भात चिकट होतो. त्यावेळेस भात मोठ्या प्लेटमध्ये पसरून ठेवा. बासमती भात बनवताना एक चमचा तूप आणि लोणी देखील वापरता येईल.

loading image