Coffee पिण्याची योग्य वेळ कोणती?

कॉफी (Coffee)
कॉफी (Coffee) esakal

सकाळी उठल्यावर चहा- कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. अनेकांना कॉफी प्यायल्याशिवाय बरच वाटत नाही. पण असं म्हटलं जातं की, सकाळी (Morning) चहा किंवा कॉफी (Coffee) पिणं हे आरोग्यासाठी (Health) नुकसान ठरू शकतं. कॉफी प्यायल्यावर तर तुम्ही जवळपास ६ तास अॅक्टीव्ह असता. त्यामुळे कॉफी पिण्याची योग्य वेळ माहिती असणे गरजेचे आहे. दिवसा कॉफी पिणे अधिक चांगले असते. त्यामागे काही कारणं आहेत.

कॉफी (Coffee)
Skin Tan होतेय! फिकर नॉट! उन्हाळात हे पाच घरगुती उपाय करा

कुठली वेळ योग्य? - ज्येष्ठांसाठी सकाळी कॉफी पिणे चांगले मानले जाते. २०१६ साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कॉलेजमधल्या नियमितपणे कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. संशोधकांनी सकाळी ६ वाजता आणि दुपारी २ वाजता या मुलांना कॉफी प्यायला दिली. ज्या मुलांना सकाळी कॉफी प्यायला दिली होती त्यांचे निष्कर्ष अतिशय चांगले मिळाले. तर, दुपारी कॉफी पिणाऱ्या मुलांचे निष्कर्ष तितके चांगले नव्हते.

कॉफी (Coffee)
ऐकावं ते नवलच! १० वर्षांच्या मुलाच्या तोंडात होते ५० दात! डॉक्टरही हैराण

कॅफीनमुळे आळस आणि झोप उडते- कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफीनचा काही वेळानंतर प्रभाव दिसायला लागतो. त्यामुळे तुम्हाला कधी सक्रिय राहण्याची गरज आहे याचा विचार करून एक कप कॉफी प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com