
Skin Tan होतेय! फिकर नॉट! उन्हाळात हे पाच घरगुती उपाय करा
Skin Tan Remedies: उन्हाळा जवळ आला कि अनेकांना त्वचा टॅन होण्याची भिती वाटते. कारण अशी स्कीन कुणालाच आवडत नाही. तुम्हालाही अशा टॅन स्कीनचा (Skin) त्रास होत असेल तर या उन्हाळ्यात (Summer) तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय (Home Remedies) करून त्वचा टॅन होण्यापासून वाचू शकता. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासूनच हे उपाय करायचे असल्याने अगदी सोपे आहेत. त्यामुळे त्वचेची जळजळ होण्यापासून आराम मिळेल शिवाय त्वचा चमकदारही होईल.

मुलतानी माती
हे आहेत पाच उपाय
मुलतानी माती- चेहऱ्यावर मुलातानी माती खूप काळापासून वापरली जाते आहे. मुलतानी माती लावून चेहऱ्याला फायदाच होतो. तुम्ही एक ते दोन चमचे मुलतानी माती, त्यात गुलाबाचे पाणी आणि काकडीचा रस असं एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. ती त्वचेवर लावून पूर्ण कोरडी होऊ द्या. मग चेहरा धुवा. तुम्हाला चेहरा अतिशय थंड वाटेल.
हेही वाचा: Diabetes असलेल्यांनी 'या' 6 पांढऱ्या पदार्थापासून राहा दूर

हळद
हळद-दूध आणि मध- हे तीनही घटक एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहरा, मान, हात आणि जिथे जिथे त्वचा टॅन झाली आहे तिथे लावा. काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंनर स्क्रब करून हे मिश्रण काढा. पाण्याने चेहरा धुवून चेहऱ्याला गुलाब पाणी लावून मॉश्चराईज करा.
टॉमेटोही फायद्याचा- टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटो हा खूप चांगला पर्याय आहे. टोमॅटो लावल्याने तुमच्या त्वचेचा रंग पूर्वीसारखाच होईल. शिवाय चेहऱ्याला आणखी चकाकी येईल. यासाठी टोमॅटोचा रस त्वचेवर लावा आणि नंतर धुवा.
हेही वाचा: Google Map मुळे रस्त्यावरील अपघात, चालान कापण्यापासून वाचाल! जाणून घ्या फिचर्स

कोरफड जेल-
कोरफड जेल- कोरफडीचे फायदे अनेक आहेत. टॅन काढून टाकण्याबरोबरच कोरफड उन्हामुळे रापलेली त्वचा मुलायम करते. तसेच हे जेल लावून चेहऱ्याला आराम मिळतो. जर तुमच्याकडे कोरफडीचे झाड असेल तर त्याचा गर काढून तोही चेहऱ्याला लावू शकता.
बटाट्याचा रस - टॅनिंग घालविण्यासाठी बटाटाही चांगला पर्याय आहे. त्यासाठी एका बटाट्याचा ज्यूस काढून तो टॅन झालेल्या भागाला लावा. हा रस सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्याला मॉश्चराईजर लावा.
हेही वाचा: महिलांनो, गर्भपातापासून लिव्ह इनपर्यंत तुम्हाला माहिती हवेत 'हे' दहा कायदे
Web Title: Skin Tan Problem In Summer Try These 5 Easy Home Remedies
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..