
Tejaswini Lonari food habits
Sakal
तेजस्विनी लोणारी, अभिनेत्री
Japanese sushi and Green chutney sandwich : हल्ली तंदुरुस्तीची इतकी क्रेझ वाढली आहे, की माझ्या खाण्याच्या आवडी-निवडींमध्येही मोठा बदल झालाय. आधी जे पदार्थ मला फार आवडायचे, ते आता मागे पडले आहेत, आणि त्यांची जागा आता आरोग्यदायी, ताजेतवाने करणाऱ्या पदार्थांनी घेतली आहे. तेलकट पदार्थांपेक्षा कोशिंबीर, पालेभाज्यांचं सूप, फळांचे रस याकडे माझं अधिक लक्ष जातं.